AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईसोबत शेतात कामाला, विंचवाने दंश केला, उपचारादरम्यान 14 वर्षीय मुलीचा मृत्यू!

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे डोक्याला विंचू चावल्यामुळे वैष्णवी जनार्दन बारवकर या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (14 year old girl died during treatment after being bitten by a scorpion in Jalna Ghansawangi)

आईसोबत शेतात कामाला, विंचवाने दंश केला, उपचारादरम्यान 14 वर्षीय मुलीचा मृत्यू!
घनसावंगीतल्या तिर्थपुरी येथे डोक्याला विंचू चावल्यामुळे वैष्णवी जनार्दन बारवकर या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 1:31 PM
Share

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे डोक्याला विंचू चावल्यामुळे वैष्णवी जनार्दन बारवकर या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आईसोबत शेतात कामाला आल्यानंतर तिच्या डोक्यावर असलेल्या ओढणीत विंचू जाऊन बसला आणि काही वेळानंतर तिच्या डोक्यावर विंचवाने दंश केला. उपचारादरम्यान  14 वर्षीय वैष्णवीचा मृत्यू झाला आहे. (14 year old girl died during treatment after being bitten by a scorpion in Jalna Ghansawangi)

आईसोबत शेतीच्या मशागतीसाठी…

सध्या महाराष्ट्रात शेतकरी पेरणीसाठी कामाला लागले आहेत. चांगला पाऊस पडेल आणि पीक चांगले येईल, या आशेवर सर्व परिवार शेतामध्ये काम करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. तिर्थपुरी येथील बारवकर परिवारही अशाच प्रकारे शेतीचे काम परिवारासह करत होते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने 14 वर्षाची वैष्णवीही आई सोबत शेतात कामासाठी गेली होती. शेतात काम करत असताना वैष्णवी हिने तिच्या जवळ असलेली ओढणी एका झाडा खाली ठेवली होती.

वैष्णवीच्या डोक्यावर विंचवाचा दंश

पाऊस पडल्याने जीव जंतू जमिनीच्या बाहेर येत असतात. वैष्णवीच्या ओढणीमध्ये विंचू जाऊन बसला. शेतात पालकांसोबत काम संपले आणि वैष्णवी हिने झाडाखाली ठेवलेली ओढणी डोक्यावर घेतली. याच वेळी विंचवाने वैष्णवीच्या डोक्यावर दंश केला. डोक्यात वेदना होत असल्याने वैष्णवी हिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.

विंचवाचं विष डोक्यात भिनलं…

वैष्णवीच्या आईने ओढणी बघितली तर त्यात विंचु असल्याचे त्यांना दिसले. विंचवाने दंश केल्याने त्याच्या विषामुळे वैष्णवीच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. आईने मुलीला होणाऱ्या वेदना लक्षात येताच वैष्णवीला तिर्थपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु विंचवाने दंश केल्याने विष डोक्यात भिनले होते.

उपचारादरम्यान मृत्यू

वैष्णवीला खाजगी रुग्णालयातून जालना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचार सुरु असताना नियतीने घात केला आणि वैष्णवीला आपला जीव गमवावा लागला. तिर्थपुरी येथील मत्सोदरी विद्यालयात शिकणाऱ्या वैष्णवीच्या अकाली मृत्युमुळे तिर्थपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(14 year old girl died during treatment after being bitten by a scorpion in Jalna Ghansawangi)

हे ही वाचा :

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ, शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या नोकरभरतीत घोटाळा? खडसे म्हणतात, प्रक्रिया ऑनलाईन!

आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.