AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola Election Reservation 2022 : अकोल्यात 25 हून अधिक नगरसेवक रिंगणाबाहेर, प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा

Akola Election Reservation 2022 : अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालंय. त्यानुसार  आरक्षणानुसार 25 पेक्षा अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे.

Akola Election Reservation 2022 : अकोल्यात 25 हून अधिक नगरसेवक रिंगणाबाहेर, प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा
अकोला महापालिकाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 3:45 PM
Share

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया अकोला पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण…

अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. यात अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालंय. यामध्ये आता नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसल्याचं बोललं जातंय. अकोल्याच्या भाजप पक्षाच्या महापौर अर्चना मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तर भाजपचे सभागृहनेते राहूल देशमुखांचा प्रभाग महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दिग्गजांना फटका बसल्याचं बोललं जातंय.

25 हून अधिक नगरसेक रिंगणाबाहेर

अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालंय. त्यानुसार  आरक्षणानुसार 25 पेक्षा अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण 91 जागा असून एकूण 46 जागा महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 15 जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

  1. 25 हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार
  2. अकोला महापालिकेत एकू़ण 91 जागा
  3. कूण 46 जागा महिलांसाठी जागा राखीव
  4. 15 जागा अनुसुचित जाती
  5. दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव

अकोला महापालिकेत एकू़ण 91 जागा असून एकूण 46 जागा महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 15 जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाने इतर मागास वर्गाचे आरक्षण नाकारल्याने एकूण 74 जागांवर खुल्या प्रवर्गासाठी राहणार असून एकुण 91 जागांमधील 46 जागा महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना 8 जागा अनुसुचित जाती महिला आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलासाठी जाहिर झाली.. तर उर्वरित 37 जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

अनुसूचित जाती, माहिलांसाठी आरक्षित जागा

  1. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण 15 प्रभागातील अनुसुचित उमेदवाराकरीता आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहीर झाली
  2.  यामध्ये सात जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाल्या.
  3. यात 3-अ, 6-अ, 9-अ, 10-अ, 12-अ, 18-अ, 19-अ, आणि 23-अ जागा आहे.
  4. अनुसूचित जमातीसाठी ’24-अ’ ही जागा महिला राखीव करण्यात आली आहे.

सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागा

  1. सर्वसाधारण महिलांसाठी 37 जागा राखीव झाल्या
  2. यामध्ये 1-अ, 5-अ, 7-अ, 8-अ, 11-अ, 13-अ, 15-अ, 16-अ, 17-अ, 21-अ, 22-अ, 26-अ, 28-अ
  3. ‘ब’ जागांसाठी 2-ब, 3-ब, 4-ब, 6-ब, 9-ब, 10-ब, 12-ब, 14-ब, 18-ब, 19-ब, 20-ब, 23-ब, 24-ब, 25-ब, 27-ब, 29-ब, 30-ब या 30 जागा आरक्षित झाल्या होत्या.
  4. उर्वरित 7 जागा ‘ज्या’ प्रभागात 2 जागा अनारक्षित आहे.
  5. त्या प्रभागातून चिठ्या टाकून आरक्षित केल्या आहे.
  6. यामध्ये 1-ब, 5-ब, 8-ब, 15-ब, 17-ब, 26-ब, 28-ब या जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेक
  7. एकूण एकत्रित 37 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
  8. या नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसण्याची शक्यता
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.