AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापजनक! अहमदनगरमध्ये महिला सरपंचाला मारहाण, शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांनी ट्विटरवरुन व्यक्त केला संताप

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून महिला सरपंचावरील मारहाणीविरोधात आवाज उठवला आहे. ही मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि गुंडशाहीचा धुडगूस थांबवण्यात यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

संतापजनक! अहमदनगरमध्ये महिला सरपंचाला मारहाण, शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांनी ट्विटरवरुन व्यक्त केला संताप
संग्रहित.
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 1:01 AM
Share

अहमदनगर : पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची संतापजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सरपंच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिला सरपंचाला मारहाणीच्या लागोपाठच्या घडलेल्या घटनांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Beating, insulting of female sarpanch in Ahmednagar; NCP’s Rupali Chakankar expressed outrage on Twitter)

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून महिला सरपंचावरील मारहाणीविरोधात आवाज उठवला आहे. ही मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि गुंडशाहीचा धुडगूस थांबवण्यात यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. महिला सरपंचाने व्हिडीओमधून गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारली व शिवीगाळ केली, असे महिला सरपंचाने व्हिडीओमध्ये म्हटले असून आरोपींविरोधात कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ग्रामसभेत आलेला वाईट अनुभव व्हिडीओमधून कथन केला आहे.

रुपाली चाकणकर यांचे ट्विट

उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मी स्वत: नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. याच सोबत त्यांनी महिला सरपंच राणी मच्छिंद्र काथोरे यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकाराचा अनुभव कथन करीत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

तंटामुक्ती अध्यक्षनिवडीदरम्यान ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ

राणी काथोरे या उक्कडगावच्या सरपंच आहेत. बुधवारी 8 सप्टेंबरला तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिला. गावात ग्रामसभा चालू असताना मी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला. विरोधी पार्टीला ही निवड मान्य नव्हती. त्यांनी आरडाओरडा केला. मी सभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असं सांगितलं. पण तेही त्यांना मान्य झालं नाही. त्यानंतर त्यांनी जास्त आरडाओरडा केला. त्यानंतर मी कार्यालयाकडे निघाली, त्यावेळी भाजपच्या गुंडांनी पाठीमागून लाथ मारली, असा आरोप राणी कथोरे यांनी केला आहे. नंतर पोलिस ठाण्यातही माझी दखल घेतली गेली नाही. तिथे मला 2 ते 4 तास बसवून ठेवण्यात आले, असाही दावा कथोरे यांनी केला आहे.

पुण्यातही झाली होती महिला सरपंचाला मारहाण

चार दिवसांपूर्वीच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एका महिला सरपंचाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. ही घटना पुण्याच्या कदमवाक वस्ती भागातील लसीकरण केंद्रात घडली होती. नंतर आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला त्या व्हिडीओमध्ये महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळाले. (Beating, insulting of female sarpanch in Ahmednagar; NCP’s Rupali Chakankar expressed outrage on Twitter)

इतर बातम्या

Video | प्रेम कोणावर करावं ? तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडीओ पाहाच, हसून लोटपोट व्हाल !

10 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची मेहुणी दोन वर्षांपासून फुटपाथवर, वाचा देशभर चर्चेत असलेली बातमी

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....