PHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड

बीडमध्ये सध्या पोलीस अधिकाऱ्याच्या एका अनोख्या कार्याची चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच या अधिकाऱ्याने लॉकडाऊनचा सदुपयोग करत तब्बल 75 हजार वृक्षारोपण केले आहे.

PHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड
Beed Laxman Kendre planted trees 4

बीड : एरवी कायद्याचा बडगा उगारून गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे अनेक अधिकारी राज्यात पाहिले आहेत. मात्र बीडमध्ये सध्या पोलीस अधिकाऱ्याच्या एका अनोख्या कार्याची चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच या अधिकाऱ्याने लॉकडाऊनचा सदुपयोग करत तब्बल 75 हजार वृक्षारोपण केले आहे. नेकनूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे असे वृक्षप्रेमी अवलियाचे नाव आहे. त्यांच्या या अनोख्या कार्यामुळे बीड जिल्ह्यात चांगली चर्चा सुरू आहे. (Beed Assistant Police Inspector Laxman Kendre planted over 75,000 trees during Lockdown)

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 91 गावं येतात. लॉकडाऊनच्या काळातच लक्ष्मण केंद्रे यांची बदली नेकनूर ठाण्यात झाली. सर्वात कमी जंगल म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. या ठिकाणी नोकरी करीत असताना नागरिकांच्या सुरक्षेसह आरोग्य अबाधित ठेवण्याची संकल्पना मांडण्यात आली.

यावेळी त्यांनी ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि नेकनूर मधील स्थानिक पत्रकार सोबत घेऊन अंकुर ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपसोबत मिळून त्यांनी दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेतले. तसेच नागरिकांना पूरक ऑक्सिजन मिळावे यासाठी लक्ष्मण केंद्रे यांनी देशी झाडांची निवड केली आहे.

पिंपळ, वड, चिंच, जांभूळ या जातीचे झाडे सर्वात जास्त लावण्यात आली आहेत. दरम्यान संपूर्ण लॉकडाऊनमध्ये नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 91 गावात तब्बल 75 हजार झाडे लावण्यात आली आहेत.

बालपणापासून वृक्षसंवर्धनाची आवड

पोलीस अधिकारी लक्ष्मण केंद्रे हे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे रहिवासी आहेत. उदगीरच्या श्यामलाल हायस्कूलमध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे धडे दिले जायचे. याचे महत्व पटले आणि जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. वृक्षारोपणाचे कार्य आणखी जोमात सुरु झाले. जिथं बदली होईल तिथं वृक्षारोपण हा छंद जोपासत लक्ष्मण केंद्रे यांनी निसर्गासोबत मैत्री केली. सध्याची परिस्थिती पाहता एका कुटुंबाने निदान पाच तरी झाडे लावावे असं पोलीस अधिकारी लक्ष्मण केंद्रे यांना वाटते.

शासनाची वृक्ष लागवड कागदावरच

“एकच लाख एक कोटी वृक्ष” अशी वलग्ना करत राज्याच्या सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने मोठा डंका वाजविला होता. बीड जिल्ह्यात मात्र प्रत्यक्षात ही सर्व मोहीम कागदावरच दिसते आहे. पालवन येथील डोंगर सोडता कुठेही शासनाची वृक्षलागवड मोहीम ठळकपणे दिसत नाही. मात्र नेकनूर येथील पोलीस अधिकारी लक्ष्मण केंद्रे यांची प्रामाणिक वृक्षारोपण आणि संवर्धनाची ही सेवा वनविभागाला मोठी चपराक आहे. (Beed Assistant Police Inspector Laxman Kendre planted over 75,000 trees during Lockdown)

संबंधित बातम्या : 

हेल्थ ॲप्लिकेशनसारख्या सुविधा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण, अशा उपक्रमांना निधी मिळवून देऊ : यशोमती ठाकूर

1 हजार मीटरचं अंतर सहा मिनिटात कापलं, अवघ्या तीन वर्षाच्या मुलीची वेगवान दौड, एकाच दिवशी दोन विक्रमांची नोंद

Video | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI