AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार, खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव येण्यापूर्वी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पाहणी करताना चिपळूण बाजारपेठेतील स्वाती भोजने नावाच्या महिलेचा हा व्हिडीओ आहे.

VIDEO | आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार, खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले
स्वाती भोजने यांचा उदय सामंतांशी संवाद
| Updated on: Jul 28, 2021 | 11:34 AM
Share

रत्नागिरी : दोन दिवस पुराच्या पाण्यात चिपळूणकरांचं साहित्य राहिल्यामुळे लाखो रुपयांच्या मालाचं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रविवारी चिपळूण दौऱ्यावर नुकसानीचा आढावा घेत असताना व्यापाऱ्यांच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी स्वाती भोजने (Swati Bhojane) नावाच्या महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिने अगदी पोटतिडकीने आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना ऐकवल्या आणि मदतीची मागणी केली. वेळ पडल्यास आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी वळवा पण आम्हाला मदत करा, अशी विनवणी या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यानंतर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी त्यांच्यावर दमदाटी केल्याचंही बोललं जात होतं. आता या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव येण्यापूर्वी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भेटीवेळचा हा व्हिडीओ आहे.

काय म्हणाल्या स्वाती भोजने

स्वाती भोजने – काही तरी करा, केवढं पाणी गेलं आमच्या घरात. तुम्ही काय पण करा

अधिकारी – स्वाती शांत हो, शांत हो, होईल सगळं, परत उभी राहशील तर बघ

स्वाती भोजने – तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलंत तर होईल ना रे

अधिकारी – स्वाती रडू नको

(मंत्री उदय सामंत यांचं आगमन)

स्वाती भोजने – तुम्ही सगळे भेटून जाऊ नका, सगळ्याची पाहणी करा

अधिकारी – मुख्यमंत्री महोदय आले बघा

स्वाती भोजने – आमचं घर गेलं, आमचं दुकान पण गेलं, आमच्या दुकानाच्या वरुन पाणी गेलं

अधिकारी – सामंत साहेब आहेत, काळजी करु नका

स्वाती भोजने – तुम्ही जातीने लक्ष द्या सगळ्यांनी, तर होणार आहे बघा, काय पण करा, सगळे जण धुतले गेले आहेत तुम्ही दोन महिन्यांचा आमदार-खासदारांचा पगार इकडे फिरवा

(भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन)

स्वाती भोजने – घराच्या वरुन पाणी गेलं, आमचं घर पण गेलं, दुकान पण गेलं. तुम्ही काय पण करा, दोन महिन्यांचा आमदार-खासदारांचा पगार कोकणाकडे फिरवा, आम्हाला सगळ्यांना मदत करा 

अधिकारी – स्वाती होय म्हटलेत साहेब

भास्कर जाधव – आईला समजव, आईला समजव, उद्या ये

स्वाती भोजने – तुम्ही सगळ्यांसाठी काही तरी करा साहेब, काही दिल्याशिवाय जाऊ नका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – करतो करतो

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

चिपळूणच्या बाजारपेठेत नेमकं काय घडलं? 

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एक-एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याच वेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं स्वाती भोजने नावाची महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये… असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

चिपळूणमधील त्या महिलेची पहिली प्रतिक्रिया

“गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला,” अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील महिला स्वाती भोजने यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

चिपळूणच्या बाजारपेठेत भास्कर जाधवांची दमदाटी, त्यावर उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले?

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिलं भाष्य, रोखठोक बोलणारे संजय राऊत म्हणतात….

भास्कर जाधवांना जनतेची अॅलर्जी? मुख्यमंत्र्यांसमोर पीडित महिलेच्या मुलाला म्हणाले, आईला समजव ! नेमकं काय घडलं?

(Chiplun Lady Swati Bhojane Viral Video demanding help to Uday Samant)

थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा.
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा.