चिपळूणच्या बाजारपेठेत भास्कर जाधवांची दमदाटी, त्यावर उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस असं सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत भास्कर जाधवांची दमदाटी, त्यावर उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले?
भास्कर जाधवांनी सांगितली मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 26, 2021 | 4:02 PM

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची रविवारी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) यांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. “कालच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस, आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस, असं सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा, असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला” अशी माहिती खुद्द भास्कर जाधव यांनी दिली आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमकं काय घडलं? 

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एक-एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याच वेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये… असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

चिपळूण शहरातील साफसफाई

दमदाटी केल्याचा आरोप लागलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज वेगळाच ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांना घेऊन भास्कर जाधव चिपळूण शहरातील साफसफाई करताना पाहायला मिळाले. आपल्यावरील झालेले आरोप फेटाळून लावत भास्कर जाधव यांनी आपण वडिलकीच्या नात्याने तो दिलेला सल्ला होता अशी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

भोजने आणि आमचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. मी सध्या करत असलेले कामच त्यांना उत्तर देईल, कालच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस असं सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडीओ

भास्कर जाधव यांनी प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आपण स्वतः रस्त्यावर असताना अधिकारी गेले कुठे? असा सवाल त्यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकाऱ्यांना केला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पाण्याची एक बाटली पुरवू शकत नाही का? काम करणाऱ्यांना निदान मदत तरी करा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारले आहे.

पाहा व्हिडीओ

चिपळूणमधील त्या महिलेची पहिली प्रतिक्रिया

“गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला,” अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील त्या महिलेने दिली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | भास्कर जाधवांनी अरेरावी केलेली नाही, त्यांचा आवाज तसा, आमचे घरगुती संबंध, चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिलं भाष्य, रोखठोक बोलणारे संजय राऊत म्हणतात….

भास्कर जाधवांना जनतेची अॅलर्जी? मुख्यमंत्र्यांसमोर पीडित महिलेच्या मुलाला म्हणाले, आईला समजव ! नेमकं काय घडलं?

VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू

(Shivsena MLA Bhaskar Jadhav reacts what CM Uddhav Thackeray told him over being angry at Chiplun Lady)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें