चिपळूण डेपोला पुराचा वेढा, 9 लाखांची रोकड घेऊन डेपो मॅनेजर 9 तास ST च्या टपावर!

पावसाच्या पाण्यात तब्बल 9 तास एसटीच्या टपावर बसून, डेपो प्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी स्वत:चा जीव आणि डेपोची रोकड वाचवली. तब्बल 9 लाख रुपये घेऊन डेपो मॅनेजर आणि त्यांचे 7 सहकारी उभ्या पावसात 9 तास एसटीच्या छतावर जाऊन बसले होते.

चिपळूण डेपोला पुराचा वेढा, 9 लाखांची रोकड घेऊन डेपो मॅनेजर 9 तास ST च्या टपावर!
chiplun st depot


रत्नागिरी : सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर हळूहळू पुराचं पाणी कमी होत आहे. मात्र जसजसं पाणी ओसरेल तसतशी पुराची दाहकता समोर येत आहे. तिकडे चिपळूणमध्ये दाणादाण उडवलेल्या पावसातील एक थरारक घटना समोर आली आहे. तीन दिवसापूर्वी चिपळूण एसटी डेपो पाण्याखाली गेला होता. मात्र याच पावसाच्या पाण्यात तब्बल 9 तास एसटीच्या टपावर बसून, डेपो प्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी स्वत:चा जीव आणि डेपोची रोकड वाचवली. तब्बल 9 लाख रुपये घेऊन डेपो मॅनेजर आणि त्यांचे 7 सहकारी उभ्या पावसात 9 तास एसटीच्या छतावर जाऊन बसले होते.  (Chiplun ST Depot Chief Ranjit Rajeshirke’s thrilling story)

रणजीत राजे शिर्के हे चिपळूण आगाराचे प्रमुख आहेत. त्यांनी चिपळूणमध्ये दोन दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसाची भीषणता टीव्ही 9 मराठीला सांगितलं. ते म्हणाले, “मी सकाळी पावणेचार वाजता डेपोत आलो. आगारामध्ये पाणी भरत होतं. त्यावेळी गुडघाभर पाणी भरलं होतं. सहकाऱ्यांच्या सहाय्याने जे जे वाचवणं शक्य होतं ते वाचवलं. कॉम्प्युटर, LCD काढून गाडीमध्ये ठेवली. आमच्याकडे जवळपास 9 लाखापर्यंत कॅश होती. कॅश काढून ती गाडीत ठेवली. पाणी खूप भरत होत, पाण्याचा प्रवाह वाढला आणि आम्हाला बाहेरच पडता आलं नाही. आम्ही दोन गाड्यांचा आधार घेतला आणि सकाळी साडेपाच सातजण मिळून टपावर जाऊन बसलो”

आम्ही साडे पाच वाजता एसटीच्या छतावर जाऊन बसलो. त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला संपर्क साधून, विभागीय कार्यालयालाही माहिती दिली. त्यानंतर पोलीस वगैरे आले आणि दुपारी तीन वाजता आम्हाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं, असं शिर्के यांनी सांगतिलं.

VIDEO : चिपळूण एसटी डेपो प्रमुख रणजीत राजेशिर्के यांची थरारक कहाणी

संबंधित बातम्या  

चिपळूणमध्ये मृत्यूचं तांडव का? ‘ही’ आहेत 5 कारणं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI