AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पाच-सहा वर्षात काय दिवे लावले ?” बैठकीतच आमदारांना प्रश्न, रस्त्याच्या कामावरुन नागरिक आक्रमक

रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याममुळे नागरिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये राडा घातला. यामध्ये आमदारांचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात चांगलाच वाद रंगला.

पाच-सहा वर्षात काय दिवे लावले ? बैठकीतच आमदारांना प्रश्न, रस्त्याच्या कामावरुन नागरिक आक्रमक
AKOLA MEETING
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 8:41 PM
Share

अकोला : रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याममुळे नागरिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये गोंधळ घातला. यामध्ये आमदारांचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात चांगलाच वाद रंगला. अकोट मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. (Citizens mess up in Akola collector and MLA meeting demanding rapid road construction work)

बैठकीला आमदार, जिल्हाधिकारी उपस्थित 

या बैठकीत अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे या गोंधळाची एकच चर्चा रंगली आहे.

रस्त्याच्या प्रश्नामुळे मतदार आक्रमक

आोयजित करण्यात आलेल्या बैठकीत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत चर्चा करण्यात येत होती. यावेळी चर्चेदरम्यान काही नागरिक अचानकपणे आक्रमक झाले. नागरिकांनी बैठक सुरु असतानाच गोंधळ घालणे सुरु केले. तसेच अकोल्यामध्ये बैठक घेणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. पाच-सहा वर्षाच्या कालावधीत काय दिवे लावले ? हे आमदारांनी सांगावे, असा खडा सवाल नागरिकांनी केला.

यापूर्वीही आमदार भारसाकळे यांना विरोध 

दरम्यान रस्त्याच्या कामामुळे मतदारांनी केलेल्या या राड्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कार्यकर्ते तसेच मतदार आमनेसामने आल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीही तेल्हारा येथे रस्त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर आमदार भारसाकळे यांना विरोध झाला होता.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

कोव्हिड लसीकरण पडताळणी प्रक्रियेपासून सुट्टी, लोकल प्रवाशांना आता ई-पास मिळणार

आपल्या आवाजात फोन आल्याचं ऐकून पवारही आश्चर्यचकीत, संशयित ताब्यात; तपास सुरू

हॅलो, सिल्व्हर ओकवरुन बोलतोय, ते बदलीचं बघा, शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन

(Citizens mess up in Akola collector and MLA meeting demanding rapid road construction work)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.