Video : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली!

किनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. (Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)

Video : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली!
किनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय...

नांदेड : किनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालंय. (Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)

या गावाला जोडणारा रस्ता देखील या पावसात वाहून गेलाय. या अतिवृष्टीची नोंद घेऊन महसूल विभागाने प्राथमिक पंचनामा केला असून सोमवारी कृषि विभाग नुकसानीची माहिती घेऊन भरपाईची कारवाई करेल असे सांगण्यात आलंय.

पन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेली

किनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय. त्यामुळे या गावाजवळ असलेला जुना मातीचा बंधारा फुटून त्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे परिसरातील जवळपास पन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेलीत तर जमीन खरडून गेल्याने आता दुबार पेरणी देखील शक्य नाही. त्यामुळे या गावातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलंय.

आधीच लॉकडाऊन, त्यात पावसाचा झटका, पिकांचं मोठं नुकसान

आधीच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा जोरदार फटका बसलाय. शेतीच्या या नुकसानीची महसूल विभागाने नोंद घेतलीय. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी पाहणी करत आढावा घेतलाय.

कृषी विभागाने आढावा घेतला

आरंडकर यांनी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाला दिलीय. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी सोमवारी गोंडजेवली गावाला भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. दरम्यान, ढगफुटी सदृश्य पावसाने गोंडजेवलीच्या ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळालय.

(Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)

हे ही वाचा :

मुंडे भगिनी समर्थकांमधील नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

भास्कर जाधवांच्या सुस्साट गाडीला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!’

‘देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?’, राऊतांचा संताप