AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री कंगना रनौतविरोधात काँग्रेसची अकोल्यात तक्रार, देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

अकोला (Akola) जिल्ह्यातल्या पातूर पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन (Haji Sayyed Kamruddin) यांनी ही तक्रार केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्य करुन स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतविरोधात काँग्रेसची अकोल्यात तक्रार, देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी
KANGANA RANAUT
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 1:18 PM
Share

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातल्या पातूर पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन (Haji Sayyed Kamruddin) यांनी ही तक्रार केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्य करुन स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरोद्दीन यांनी शुक्रवारी (19 नोव्हेंबर) पातूर पोलीस येथे कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सैय्यद कमरोद्दीन यांनी पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

स्वातंत्र्याविषयी कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य

बॉलिवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक टीका झाल्या. कंगनाने मंगळवारी (16 नोव्हेंबर) एका वक्तव्यात म्हटले की, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले. तर 1947 मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते. इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे कंगना रनौत सध्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

कंगनाचं स्पष्टीकरण

टीकेनंतर कंगनाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘मी स्पष्टपणे सांगितले आहे की, 1857ची क्रांती ही पहिली स्वातंत्र्य लढा होती, जी दडपली गेली आणि परिणामी ब्रिटिशांचे अत्याचार आणि क्रूरता वाढली आणि सुमारे शतकानंतर आम्हाला गांधीजीच्या भांड्यात भीकरुपी स्वातंत्र्य दिले गेले.’

स्वतःच्या वक्तव्याचे समर्थन!

सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कंगनाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक स्टोरी टाकून तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘1947 मध्ये नेमके काय घडले, हे कोणी सांगितल्यास ती पद्मश्री पुरस्कार परत करेल.’ तिने एका कात्रणाचा फोटो टाकून लिहिले आहे की, सर्व काही अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे. 1857मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहीत आहे, पण 1947 मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहिती नाही.’

संबंधित बातम्या :

एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं, मंत्री विजय वडेट्टीवारांनी कंगनाला फटकारलं

Kangana Ranaut Controversy | दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही!, कंगना रनौत पुन्हा बरळली!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.