Video | सोलापुरात म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

सोलापुरात आषाढ महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

Video | सोलापुरात म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ
म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारे गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.


सोलापूर : सोलापुरात आषाढ महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णिक नगरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. (corona rules violated in buffalo running program in solapur karnik nagar)

जमलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नाही 

आषाढ महिन्यानिमित्त सोलापुरातील कर्णिक नगरात म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळीही हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, येथे कोरोना नियामांचे कोणतेही पालन झाले नाही. येथे जमलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नव्हता. तसेच बहुतांश नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हता.

पाहा व्हिडीओ :

अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आवर घालण्याची मागणी

राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग थोपवण्यात अजूनही यश मिळालेले नाही. असे असताना कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग सोबतच मास्क वापरण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. मात्र, असे असले तरी नागरिक या निमयांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्याचीच प्रचिती कर्णिक नगर येथे आली. येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांना कुठेतरी आवर घालण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

इतर बातम्या :

राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा

पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भर पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

(corona rules violated in buffalo running program in solapur karnik nagar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI