यंदा सांगलीतील शिराळ्यात नागपंचमीवर ‘ड्रोन’ची नजर, ‘हे’ आहे कारण

सांगली जिल्ह्यातील 32 शिराळामध्ये शुक्रवारी (13 ऑगस्ट) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवेळी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे. जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

यंदा सांगलीतील शिराळ्यात नागपंचमीवर ‘ड्रोन’ची नजर, 'हे' आहे कारण
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:37 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील 32 शिराळामध्ये शुक्रवारी (13 ऑगस्ट) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवेळी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे. जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे गर्दी होऊ नये आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी जिवंत नागाची पूजा रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलीय. यासाठी 16 पथके तैनात करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली आहे.

जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. यामुळे जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथे यंदाही प्रतिबंध लागू आहेत. दुसरीकडे कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने नागपंचमी निमित्त होणाऱ्या यात्रेवरही प्रतिबंध घालण्यात आले. ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिराचे दरवाजेही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र पारंपरिक पूजेसह प्रतिकात्मक नागपूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्पाची हाताळणी अथवा प्रदर्शन होणार नाही यासाठी जनजागृती

शिराळा परिसरात कोठेही सर्पाची हाताळणी अथवा प्रदर्शन होणार नाही यासाठी वन विभाग गेले चार दिवस जनजागृती केली. नागपंचमी वेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी वन कर्मचारी, पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वन विभागाची 6 फिरती आणि 10 गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. 2 ड्रोन कॅमेऱ्याद्बारे संपूर्ण परिसरावर सूक्ष्म नजर ठेवण्यात येणार आहे.

वन विभागाच्या मदतीला पोलिसांचीही कुमक तैनात

याशिवाय सांगलीत 6 चलचित्रीकरण कॅमेरे, एक श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे 4 सहायक वनरक्षक दर्जाचे 4 अधिकारी, वनक्षेत्रपाल 18, वनपाल 30, वनरक्षक 50 असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच वन विभागाच्या मदतीला पोलिसांचीही कुमक तैनात करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याचे आदेश, जलसंपदामंत्री जयंत पाटलांकडून निर्णयांचा धडका

मनाच्या आडोशाची जागा नैराश्याच्या गर्तेत, मिरजेत 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं, कारण…

एसटी चालकाने आधी डिझेल भरलं, नंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विचित्रप्रकार, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नेमकं हेरलं आणि…

Drone surveillance by Sangli Forest department on Nagpanchami

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.