ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?; गोपीचंद पडळकरांचा संतप्त सवाल

आघाडी सरकारमध्ये नियुक्त्या आणि पदभरतीवरून सुरू असलेला गोंधळ काही थांबताना दिसत नाही. त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. (gopichand padalkar)

ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?; गोपीचंद पडळकरांचा संतप्त सवाल
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

सोलापूर: आघाडी सरकारमध्ये नियुक्त्या आणि पदभरतीवरून सुरू असलेला गोंधळ काही थांबताना दिसत नाही. त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. पदभरती आणि नियुक्त्यांवरून प्रशासन आणि सरकारमध्ये काहीच ताळमेळ नाही. हे फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (gopichand padalkar slams maha vikas aghadi over job recruitment)

गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरला जीव गमवावा लागला होता. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या. प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेता का?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

बहुजनांच्या मुलांनी सतरंज्याच उचलाव्यात का?

आतातर यांनी वेगवेगळ्या 20 विभागातील 11,351 पदे रिक्त असताना मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त 4,264 रिक्त पदांच्या पदभरतीची मागणी केली. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील 2500 च्या आसपास पदे रिक्त असताना अमित देशमुखांच्या खात्यानं लोकसेवी आयोगाला काहीच मागणी केली नाही. हीच बोंब अनके खात्यांची आहे. स्वत:ची मुलं, नातू, आमदार, खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात. पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

गोंधळ सुरूच, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. मात्र शासनाने रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कुणी प्रवास करत होतं. तर कुणी अगोदरच पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम 12 तास बाकी असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे?

दरम्यान, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही, प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं, सगळंच कन्फ्युजन आहे. काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत. या पदांसाठी त्यांच्यापासून ५ लाख, १० लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केले.

या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला. या प्रकरणाची १०० टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का?, असा सवाल फडणवीसांनी विचारला. हा दलालीचा नवा अध्याय सुरु झालाय, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, असंही फडणवीस म्हणाले. (gopichand padalkar slams maha vikas aghadi over job recruitment)

 

संबंधित बातम्या:

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो : राजेश टोपे

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI