AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Raid : चंद्रपुरात बनावट सुगंधीत तंबाखू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड, तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या सुगंधित तंबाखूची भेसळ व विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींवर तळोधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे सुगंधित तंबाखू माफिया तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Chandrapur Raid : चंद्रपुरात बनावट सुगंधीत तंबाखू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड, तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुरात बनावट सुगंधीत तंबाखू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाडImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 8:58 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखे (Local Crime Branch)ने नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथील वलनी स्थित फार्महाऊसवर धाड (Raid) मारून सुगंधित तंबाखू (Tobacco) बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मौजा वलनी स्थित सचिन वैद्य यांच्या फार्म हाऊसवर मशिनद्वारे मजा, ईगल व हुक्का बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मशिनद्वारे भेसळ करीत त्याची विक्री करीत ते या ठिकाणांहून इतरत्र पाठविण्याचे कामही चालू होते. पोलिस पथकासमोर आरोपींनी कशाप्रकारे सुगंधित तंबाखू भेसळ करतात त्याचे प्रात्यक्षिकही दाखविले.

एकूण 25 लाख 71 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सलमान आरिफभाई कासमानी (27 रा. आरमोरी गडचिरोली), सागर तेजराम सतिमेश्राम (23 रा. साकोली भंडारा), रोहित माणिक धारणे (22 रा. ब्रम्हपुरी), वैभव भास्कर भोयर (22 रा. आरमोरी गडचिरोली), मयुर सुरेश चाचरे (27 साकोली भंडारा), सागर संजय गडभिये (24 रा. साकोली भंडारा), खेमराज विलास चटारे (20 रा. आरमोरी गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. घटनास्थळी हुक्का, शिशा, मजा ईगल व सुगंधित खुला तंबाखू 990 किलो 800 ग्रॅम, सुगंधित तंबाखू भेसळ करणाऱ्या मशीन, कच्च्या व पक्का मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन, गुन्ह्यात वापरलेले एकूण 8 मोबाईल फोन असा एकूण 25 लाख 71 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या सुगंधित तंबाखूची भेसळ व विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींवर तळोधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे सुगंधित तंबाखू माफिया तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (In Chandrapur the local crime branch raided a factory producing counterfeit snuff)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.