आईच्या डोळ्यादेखत दोन चिमुरडी नाल्यात वाहून गेली, रायगडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

खोपोलीतील क्रांतीनगर भागातील दोन छोटे बहीण-भाऊ नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. खोपोली पोलिसांसह स्थानिकांच्या वेगवेगळ्या टिम नाल्याच्या प्रवाहात 2-3 किमी परिसरात सर्च ऑपरेशन राबवत आहेत.

  • Updated On - 9:01 pm, Mon, 19 July 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
आईच्या डोळ्यादेखत दोन चिमुरडी नाल्यात वाहून गेली, रायगडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

रायगड : कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही मुंबई, ठाणे, खोपेलीसह कोकण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी झाल्याने वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तर उल्हास नदीला पूर आला आहे. बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अॅलर्ट झालं आहे. दरम्यान, खोपोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आईच्या डोळ्यादेखत तिची दोन चिमुरडी मुलं नाल्यात वाहून गेली आहेत. (Khopoli : little sister and brother fell into Drainage, were carried away)

खोपोलीतील क्रांतीनगर भागातील दोन छोटे बहीण-भाऊ नाल्यात वाहून गेले. क्रांतीनगर या झोपडपट्टी भागाला लागून एक मोठा नाला आहे. आईच्या डोळ्यादेखत तिची लहान मुलं नाल्यात पडून वाहून गेली. खोपोली पोलिसांसह स्थानिकांच्या वेगवेगळ्या टिम नाल्याच्या प्रवाहात 2-3 किमी परिसरात सर्च ऑपरेशन राबवत आहेत. परंतु अद्याप ही मुलं सापडली नाहीत.

सर्च ऑपरेशन हाती घेऊन आतापर्यंत पाच तास उलटले आहेत. परंतु अद्याप या चिमुकल्यांचा शोध लागलेला नाही. निलम श्रीकांत हंचलीकर (7) बाबू श्रीकांत हंचलीकर (5) अशी या वाहून गेलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या मुलांना शोधण्यासाठी खोपोली पोलिसांनी स्थानिकांसोबत शोधमोहीम सुरु केली आहे.

आज दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. दोन्ही मुलं आईसोबत विसर्गासाठी गेली होती. परंतु आईने दोघांना घरी जाण्यास सांगितले, मात्र दोन्ही मुलं घरी न जाता सार्वजनिक शौचालयाशेजारी असलेल्या नाल्यात खेळत होती. मुलं घरी न आल्याचे आईला समजल्यानंतर तिने व तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. परंतु त्यावेळी काही जणांनी सदर मुले नाल्यात पडताना पाहिली असल्याचे सांगितले. मात्र नाला दुथडी भरुन वाहत असल्यामुळे मुलं दिसेनाशी झाली.

कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी

कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. रात्री नऊ वाजता 2.5 मीटरची भरती येणार आहे. त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

कल्याणमध्ये रस्ता खचला

कल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

संबंधित बातम्या

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

Mumbai Rains Live Updates | मुंब्रा शीळ फाटा ते पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद

Mumbai Rain : कुठे भिंत तर कुठे दरड कोसळली, गेल्या 24 तासांत मुंबईत 33 जणांचा मृत्यू

(Khopoli : little sister and brother fell into Drainage, were carried away)