संशयातून वीरेंद्रने पत्नी सुमतीच्या पोटात व छातीत पाच धारदार चाकूने पाच वार केले. तर मुलगी सिमरनच्या पोटात एक घाव केला. या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेकोली माजरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सुमनचा मृत्यू झाला.
चंद्रपूर : चारित्र्याच्या संशयावरुन व्यसनी पतीने पत्नी आणि मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना माजरी-भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मुलीवर चंद्रपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीरेंद्र रामप्यारे साहनी (43) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.