VIDEO | मला वाटलं मी धनगर म्हणून जनावराचं खातं दिलं, मराठ्याचीही अवस्था तिच केली, जानकरांची फटकेबाजी

मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. सावरगावची निर्मिती कुणी केली. हू ईज क्रिएटर ऑफ सावरगाव? पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का? असे सवालही जानकर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

VIDEO | मला वाटलं मी धनगर म्हणून जनावराचं खातं दिलं, मराठ्याचीही अवस्था तिच केली, जानकरांची फटकेबाजी
मला वाटलं मी धनगर म्हणून जनावराचं खातं दिलं, मराठ्याचीही अवस्था तिच केली, जानकरांची फटकेबाजी
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 3:54 PM

बीड : दसऱ्यानिमित्त बीडमधील सावरगाव येथील भगवानगडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंसह महादेव जानकरांनीही उपस्थिती दर्शवली आहे. दसरा मेळाव्यानिमित्त जनतेशी संवाद साधताना महादेव जानकरांनी चांगलीच फटकेबाजी आपल्या भाषणातून मारली आहे. आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेंच्या पाठी खंबीर रहा, असे आवाहनही महादेव जानकर यांनी यानिमित्ताने केले. काँग्रेसचं सरकार आलं तर जनावरांचं खात धनगराला, भाजपचं सरकार आलं तरी जनावराचं खातं धनगरालाच असे सांगत पोटात दुखतंय का तुमच्या ? असा सवाल त्यांनी केला आहे. (Mahadev Jankar speech at savargaon bhagwangad dasara melava)

काँग्रेस येवो किंवा भाजप, जनावरांचं खातं धनगरालाच

काँग्रेसचं सरकार आलं तर जनावरांचं खात धनगरालाच आणि भाजपचं सरकार आलं तरी जनावराचं खातं धनगरालाच. अरे वा रे वा पठ्ठ्यांनो…अरे देशात तिसरा आलेला इंजिनिअर आहे मी. पोटात दुखतंय का तुमच्या ? आम्हाला लावलंय मासं धरायला, आम्हाला लावलंय दूध काढायला, आम्हाला लावलंय बैलं राखायला. कर्डिले साहेब माझ्या अगोदर तुमच्याकडेही ते खातं होतं, मी धनगर आहे म्हणून चालतंय, पण मराठ्याची पण अवस्था तीच चाललेय, अशी फटकेबाजी जानकरांनी केली आहे.

काय म्हणाले महादेव जानकर?

मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. सावरगावची निर्मिती कुणी केली. हू ईज क्रिएटर ऑफ सावरगाव? पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का? असे सवालही जानकर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल पण जाईल. आम्ही गद्दार होणार नाही. लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण महादेव जानकर तुला सोडणार नाही, असे जानकर म्हणाले.

31 मे ला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर केलं. नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. ते रक्तातच असावं लागतं. रक्तच असावं लागतं. आरशासमोर भाषण केल्याने नेता होत नाही. नकली तर नकली असतो. नेता व्हायला अक्कल लागते. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचा नव्हता. ब्राह्मण ते मुस्लिमांचा होता. भगवान बाबांना जात नव्हती. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस, पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे. काल ओबीसींची एमपीएससी यूपीएसीची लिस्ट झाली. 272 पैकी ३६ पोरं भगवान बाबाच्या जातीची झाली. मंत्रीपदाच्या मांडवा खालून मीही गेलो आहे. एखादा मंत्री आणि आमदार होईल. काय पॉवर आणि काय असतं आम्हाला माहीत आहे, असेही जानकर यांनी यावेळी म्हटले आहे. (Mahadev Jankar speech at savargaon bhagwangad dasara melava)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.