अन्नावाचून तडफडून सोडला प्राण, माय लेकींच्या मृत्यूने चंद्रपूर हळहळलं

चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला.

अन्नावाचून तडफडून सोडला प्राण, माय लेकींच्या मृत्यूने चंद्रपूर हळहळलं
उपासमारीने आई लेकीने मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 10:45 AM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला.

उपासमारीने मृत्यू

दोघींचा भूकेने आणि आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वीच पोचू चौधरी यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून दोघी मायलेकी एकत्र राहत होत्या.

गेल्या अनेक महिन्यापासून या मायलेकी आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्याकडून कुठलीही कामे होत नव्हती. तसंच बऱ्याच वेळी त्यांना काही खायला देखील मिळत नव्हतं. मृत्यूच्या अगोदर काही दिवस पोटात अन्नही नसल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रा.पं. कार्यालयात याची माहिती मिळताच सरपंच मोरेश्वर लोहे व सहकारी घटनास्थळी पोचले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना

पोलिस प्रशासनाला माहिती देत मृतदेहाचे पंचनामा करण्यात आले. यात संशयास्पद असे काहीही आढळून आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह गावात पोचताच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. कोठारी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दोघीही मायलेकी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायच्या. कधी आई भिक्षा मागायची तर कधी लेक…. भिक्षुकीवरच त्यांची गुजराण व्हायची… पण मधल्या काळात त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलं… जमिनीला खिळून राहिल्या… अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार

चंद्रपूर शहरात दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी आरोपींनी मृतकाला प्रचंड दारु पाजली. त्यानंतर त्यांनी आधीचा भांडणाचा विषय काढत वाद घातला. वाद चिघडल्यानंतर आरोपींनी मित्रावर चाकूने वार करत हत्या केली. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

आरोपींनीच पोलिसांना फोन करुन हत्येची माहिती दिली

चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या निर्जन भागात युवकाची हत्या झाल्याची घटना आज (11 सप्टेंबर) उजेडात आली आहे. तिरवंजा गावी राहणाऱ्या संकेत सुमटकर याची 2 मित्रांनी जुन्या वादातून हत्या केल्याचे तपासात उघड झालंय. शुभम साखरकर आणि संगम सागोरे या दोघांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे आरोपींनी स्वतः पोलिसांना फोन करुन या हत्येची माहिती दिली.

(mother and Daughet Death in Chandrapur Due to starvation)

हे ही वाचा :

जुन्या भांडणाचा राग, गोड बोलून मित्राला फिरायला बोलावलं, वेगवेगळ्या ठिकाणी दारु पाजली, नंतर मध्यरात्री काटा काढला

हा चित्रपट नाही, ही खरी हत्या, नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद

नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....