हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका

राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी केली.

हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका
narayan rane

सिंधुदुर्ग: राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी केली.

नारायण राणे आज कोकणात होते. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी या बैठकीवरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका राणेंनी केली.

दंगलीचं खापर भाजपवर कशाला?

महाराष्ट्रातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र धगधगतोय त्याचं खापर भाजपवर फोडण्याचं कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

जाहीर केलेले पैसे मागून घेतले

जिल्ह्याचा विकासा फंड हा दिवसे न् दिवस कमी होत आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फक्त 9 टक्के खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. सिंधुदुर्गाला तर ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ती अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात वादळ आलं, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. आता कुठे निधीचं वाटप होणार आहे. जिल्हा नियोजनाची बैठक ही निव्वळ औपचारिकता आहे. जानेवारीनंतर आज बैठक होत आहे. विकासाला चालना मिळेल असं बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असं या सरकारचं धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने 46 कोटी रुपये दिले होते. मात्र, विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून तो निधी परत मागवून घेतला, असा गंभीर आरोप राणेंनी केला.

विकास कामात खोडा घालत नाही

विकासाच्या कामात मला खोडा घालायचा नाही. मी या विषयावर कधी बोललो नाही. आजही बोललो नाही. विकासाच्या कामात मी कधीही खोडा घालत नाही. आधी मेडिकल कॉलेजला ज्या गोष्टी लागतात त्या पुरवा आणि मग बोला, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

भाजपने सरकार पाडण्याचा नाद सोडला?, चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा

1st Audit Day: ‘आधीच्या सरकारांमध्ये NPA वाढतच गेले, आम्ही त्यांचे सत्य देशासमोर मांडले’- पंतप्रधान मोदी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI