गडचिरोलीत खवल्या मांजराची तस्करी, आरोपीला पोलिसांच्या बेड्या, तस्करी रोखण्याचं वनविभागासमोर आव्हान

इरफान मोहम्मद

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 1:18 PM

जिल्ह्यातील असरअली वनपरिक्षेत्र कार्यालयातर्गत जंगल परिसरात एका इसमाने खवल्या मांजराला पकडून तस्करी करण्याच्या हेतूने घरी आणलं होतं. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वन विभागाने धाड टाकून खवल्या मांजरसह आरोपीला अटक केली आहे.

गडचिरोलीत खवल्या मांजराची तस्करी, आरोपीला पोलिसांच्या बेड्या, तस्करी रोखण्याचं वनविभागासमोर आव्हान
गडचिरोलीत खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

गडचिरोली : जिल्ह्यातील असरअली वनपरिक्षेत्र कार्यालयातर्गत जंगल परिसरात एका इसमाने खवल्या मांजराला (Pangolins Cat) पकडून तस्करी करण्याच्या हेतूने घरी आणलं होतं. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वन विभागाने धाड टाकून खवल्या मांजरसह आरोपीला अटक केली आहे.

खवल्या मांजराची तस्करी, आरोपीला पोलिसांच्या बेड्या

खवलं मांजर हे वन्यप्राणी वन ग्रेड ए मध्ये मोडत असल्यामुळे याला पकडणे किंवा पालन करणे हे कायद्याने गुन्हा असल्याने सात किलो वजनाच्या खवल्या मांजरासह आरोपीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं.

बाजारात खवल्या मांजराची विक्रमी किंमत, तस्करीत वाढ

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी आणि ठाणे येथील खवल्या मांजराच्या कारवाईत वन विभागाच्या समोर काही आव्हानं निर्माण झाली आहेत. कारण दिवसेंदिवस खवल्या मांजराच्या तस्करीत वाढ होतीय. 40 ते 50 लाखामध्ये बाजारात खवल्या मांजर विकलं जातं. कॅन्सरची औषधे तयार करण्यासाठी खवल्या मांजर उपयोगात आणलं जातं, असा दावा केला जातो.

खवले मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर

चीन आणि व्हिएतनाममध्ये खवल्या मांजराला खूप मागणी आहे. खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. खवले मांजर नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी या प्राण्याच्या व्यापाराचे मार्ग बंद करणं, तसंच अवैध मार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी वन विभाग सातत्याने प्रयत्न करतो आहे.

(Pangolins Cat Smuggling gadchiroli police Arrest Accussed)

हे ही वाचा :

समुद्री शंख, शिंपले, जंगली कंद आणि वन्यजीवांच्या अवयवांची खरेदी-विक्री, येवल्यात अंधश्रद्धा वाढीला, आता वनविभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

Photo Story: 29 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा आसूड कडाडणार; नाशिकमध्ये जिल्हाव्यापी ‘ट्रॅक्टर मार्च’ची हाक!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI