पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी मतदान संपन्न

पोटनिवडणुकी आधी पालघर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 57 सदस्य आहेत. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे आहे. पालघर जिल्हा परिषदेवर सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे.

पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी मतदान संपन्न
पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी मतदान संपन्न
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 9:36 PM

पालघर : पालघर जिल्हापरिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी आज मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागांसाठी मतदान पार पडले. जिल्ह्यात आज सर्वत्रच सुरळीत मतदान पार पडले आहे. मात्र 15 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वतःचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनीही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली. (Polling for 29 seats in Zilla Parishad Panchayat Samiti by-election held in Palghar)

पोटनिवडणुकी आधी पालघर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 57 सदस्य आहेत. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे आहे. पालघर जिल्हा परिषदेवर सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे.

पोट निवडणुकी आगोदर पक्षीय बलाबल

शिवसेना सदस्य – 18 राष्ट्रवादी – 15 काँग्रेस – 1 कम्युनिष्ठ – 05 बहुजन विकास आघाडी – 04 भाजप – 12 अपक्ष – 02 एकूण – 57

पालघर सदस्यत्व रद्द झालेले पक्ष आणि संख्या

15 सदस्यांचे रद्द झालेल्या पालघर जिल्हापरिषद गटमधील पक्ष

राष्ट्रवादी – 07 भाजप – 04 शिवसेना – 03 सीपीएम – 01

14 सदस्यांचे रद्द झालेले पंचायत समिती गणमधील पक्ष

राष्ट्रवादी – 01 शिवसेना – 06 भाजप – 01 बहुजन विकास आघाडी – 03 मनसे – 02 अपक्ष – 01 एकूण – 14

पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती

जिल्हापरिषद गटामध्ये डहाणू – 04 वाडा – 05 पालघर – 02 तलासरी – 01 विक्रमगड – 01 मोखाडा – 02 एकूण – 15 जागा

पंचायत समिती गण

डहाणू – 02 वाडा – 01 पालघर – 09 वसई – 02 एकूण – 14 जागा

सध्या संख्याबळानुसार पालघर जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोट निवडणुकीत हे सर्व पक्ष एकमेकांसमोर स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे या पोट निवडणुकीत ज्यांना कुणाला किती जागा मिळणार आहेत त्यावर पालघर जिल्हापरिषद कुणाकडे हे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपा विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, कम्युनिस्ट यांनी जर बाजी मारली तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता पालघर जिल्हा परिषदेवर येण्याची शक्यता आहे. अन्यथा जर भाजपाने आपल्या जागा वाढविल्या तर महाविकास आघाडीला खिंडार पाडू शकतो. पण सध्या राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात केलेले विकास काम, सध्या शिवसेनेची असलेली सत्ता यामुळे पुन्हा पालघरवर शिवसेनेची सत्ता कायम राहणार असा विश्वास शिवसेनेचे पालघर खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. (Polling for 29 seats in Zilla Parishad Panchayat Samiti by-election held in Palghar)

इतर बातम्या

आदिवासी पारधी महासंघ काँग्रेस पक्षात विलीन, नाना पटोले म्हणतात आम्ही विकासासाठी कटिबद्ध !

लखीमपूर हिंचाराचाला विरोधकांकडून ‘जालियनवाला बाग हत्यांकांडा’ची उपमा, आता भाजपकडून मावळ गोळीबाराची आठवण

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.