लातूर : प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. मात्र असं असलं तरी त्यांनी आपले राजकीय दरवाजे सर्वांसाठी मोकळे ठेवले आहेत. भाजप जर मनुस्मृतीचा त्याग करत असेल तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार आहोत. भारतात कोणीही कुणाचा शत्रू नाही. सर्वच भारतीय आहेत. फार फार तर टोकाचे मतभेद असू शकतात. पण भाजपने आमची अट मान्य केली तर त्यांच्याशीही घरोबा होऊ शकतो, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.