राज ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा, मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्याविरोधात स्थानिक एकवटले?

राज ठाकरे यांना भेटूनच आपण इथून जाणार असल्याचा पीडितांनी निर्धार केला. राज ठाकरे यांनी महिलांची कैफियत ऐकूण घेतली. त्यांच्याकडून निवेदन स्वीकारलं.

राज ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा, मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्याविरोधात स्थानिक एकवटले?
राज ठाकरे यांचा चंद्रपूर दौराImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 3:49 PM

नीलेश डाहाट

चंद्रपूर : स्थानिक मनसे पदाधिकारी आणि स्थानिक लोकांची एनडी हॉटेलच्या बाहेर घोषणाबाजी करायला सुरवात केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांची कलकाम कंपनीने (Kalkam Company) फसवणूक केली आहे. त्या कंपनीच्या विरोधात हे सर्व लोक हॉटेल एनडी हॉटेलच्या बाहेर एकवटले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिमा ठाकूर आणि भरत गुप्ता (Bharat Gupta) या मनसे पदाधिकाऱ्यांनी या कंपनीला अभय दिलं. त्यामुळं आम्हाला गेली 4 वर्षे आमचे गुंतवलेले पैसे मिळाले नाहीत. आम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहोत, असं आंदोलक म्हणाले.

आम्हाला फक्त दोन मिनिटांची भेट हवी आहे. जोपर्यंत भेट होणार नाही आम्ही हॉटेलच्या बाहेरून निघणार नाही, अशी आमची भूमिका आहे, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे.

रियल इन्फ्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. कलकाम कंपनीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उतरलेल्या हॉटेल समोर पीडितांनी निदर्शने केली.

कलकाम कंपनीला चंद्रपूरच्या स्थानिक मनसे नेत्यांनी संरक्षण व समर्थन दिल्याचा आरोप आहे. याच संशयित नेत्यांनी पीडितांना मारहाण केल्याचा देखील आरोप आंदोलकांनी केलाय.

मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत पसरलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी दाद मागायची आहे. त्यासाठी पीडित राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर पोहोचलेत.

जोरदार नारेबाजी करून या कलकाम घोटाळा विरोधात कैफियत मांडली. राज ठाकरे यांना भेटूनच आपण इथून जाणार असल्याचा पीडितांचा निर्धार आहे.

चंद्रपुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वेगळा अंदाज बघायला मिळाला. काल शहरात रात्री मुक्कामाच्या हॉटेलमध्ये पोहचल्यावर राज थेट केक हॉटेल प्रवेशदारापाशी असलेल्या केक शॉपमध्ये दाखल झाले.

इथल्या केकच्या व्हेरायटी न्याहाळत त्यांनी 4 वेगवेगळ्या केकची खरेदी केली. राज यांनी हॉटेल मालकांच्या स्वागताचा देखील स्वीकार केला. चारही केकचे स्वतः पैसेदेखील देत राज हॉटेल रूमकडे रवाना झाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.