AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आ. रणजित कांबळेंच्या पाठपुराव्याला यश, 10 टक्के खनिज विकास निधीची वसुली, राज्याच्या तिजोरीत 150 कोटी!

भाजप सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता (Samrudhhi Mahamarg) लागणाऱ्या गौण खनिजावर स्वामित्वधन (रॉयल्टी) तत्कालीन सरकारने माफ केले होते. परंतु, कंत्राटदाराला रॉयल्टीच्या दहा टक्के खनिज विकास निधी जमा करणे बंधनकारक होते. तरीही कंत्राटदाराने 10 टक्के निधी देण्यास हात वर केले होते.

आ. रणजित कांबळेंच्या पाठपुराव्याला यश, 10 टक्के खनिज विकास निधीची वसुली, राज्याच्या तिजोरीत 150 कोटी!
MLA Ranjit Kambale- Samruddhi Mahamarg
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 02, 2021 | 8:22 AM
Share

वर्धा : भाजप सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता (Samrudhhi Mahamarg) लागणाऱ्या गौण खनिजावर स्वामित्वधन (रॉयल्टी) तत्कालीन सरकारने माफ केले होते. परंतु, कंत्राटदाराला रॉयल्टीच्या दहा टक्के खनिज विकास निधी जमा करणे बंधनकारक होते. तरीही कंत्राटदाराने 10 टक्के निधी देण्यास हात वर केले होते. आता सरकार बदलताच आमदार रणजित कांबळे यांच्या पाठपुराव्याने दहा टक्के खनिज विकास निधी जमा करण्याचे आदेश महसूल आणि वनविभागाने दिलेत. त्यामुळे जिल्ह्यांच्या खनिज विकास निधीत कोट्यावधीची भर पडणार आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात या आदेशामुळे जवळपास 10 ते 12 कोटी, तर राज्याला 150 कोटीच्या जवळपास खनिज विकास निधी मिळणार आहे (Samrudhhi Mahamarg 10 percent of mineral development fund of royalty on Secondary minerals will be recovered from the contractor).

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 700 किलोमीटर अंतरचा असून 55 हजार 305 कोटींचा हा प्रकल्प आहे. हा महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातील 26 तालुक्याच्या 392 गावातून गेला आहे. दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरु असून सध्या ते अंतिम टप्प्यात आहे. तत्कालीन सरकारने निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या गौणखनिजाची रॉयल्टी राजपत्र काढून माफ केली. त्यामुळे जिल्ह्याला रॉयल्टीच्या माध्यमातून मिळणारा कोट्यवधीचा निधी कंत्राटदाराच्या घशात गेला.

या महामार्गाकरिता मोठ-मोठ्या टेकड्या भूईसपाट झाल्या. पण, जिल्ह्यांना खनिज विकास निधीला मुकावे लागले. रॉयल्टी माफ झाली तरीही कंत्राटदाराने दहा टक्के खनिज विकास निधी जिल्हा खनिकर्म विभागाकडे जमा करणे बंधनकारक होते. कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने वर्धेचे आमदार रणजित कांबळे आणि जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी पत्रव्यवहार करुन दहा टक्के अंशदान निधी जमा करण्याच्या सूचना केल्यात.

मात्र, सरकारच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने आपली मुजोरी कायमच ठेवली. अखेर सरकार बदलताच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याची दखल घेत महसूल आणि विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन कंत्राटदाराकडून दहा टक्के अंशदान निधी वसूल करण्याचे निर्देश दिले.

समृद्धी महामार्गाकरिता रॉयल्टी माफ करण्यात आल्याने खनिज विकास निधीही माफ झाल्याची धारणा कंत्राटदार कंपनीची झाली होती. उत्खननाची परवानगी दिल्यानंतर रॉयल्टीच्या दहा टक्के खनिज विकास निधी भरणे बंधनकारक आहे. या निधीतून खानबाधित क्षेत्रामध्ये ‘पंचप्रधान खनिज कल्याण योजनें’तर्गत विकास कामे केली जातात. त्यामुळे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता महसूल आणि वन विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कंत्राटदाराकडून दहा टक्के खनिज विकास निधी वसूल करण्याचे निर्देश दिलेत.

याबाबत आमदार रणजित कांबळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेत आणि पत्र पाठवत पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याची दखल घेत दहा टक्के अंशदान निधी जमा करण्याचे निर्देश दिल्याने आता सर्वच जिल्ह्यांला याचा फायदा होणार आहे.

Samrudhhi Mahamarg 10 percent of mineral development fund of royalty on Secondary minerals will be recovered from the contractor

संबंधित बातम्या :

पुण्यातील रिंग रोड प्रकल्पबाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला?

राज्य शासनाचा मोठा निर्णय, नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...