AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सोलापूर सज्ज, पंढरपूरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, भरणेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा

उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सोलापूर सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सोलापूर सज्ज, पंढरपूरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, भरणेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा
दत्ता भरणे
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 9:13 AM
Share

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता हे पाहता यापुढे कोणत्याही रुग्णास उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सोलापूर सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाकडून विशाखापटनम, कर्नाटक व पुणे येथून जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला भविष्यात जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावू नये तसेच रुग्णांना वेळेत उपचार व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णांना वेळेत योग्य उपचार करणे शक्य होणार आहे तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे भरणे यांनी सांगितले.

जेव्हा मंत्री अभियानाचे नाव विसरतात………

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे व विश्वासू असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  हे काही दिवसांपूर्वी भर सभेत अभियानाचे नावच विसरले. तर दुसऱ्या कार्यक्रमात आजची तारीख विसरले व हा सर्व प्रकार भर सभेत व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कामाबद्दल नेहमीच काळजी घेत असतात, मात्र त्यांचे सहकारी असा विसरभोळेपणा करीत असतील तर ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे. भरणे यांनी यापूर्वीदेखील भरसभेत सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, त्यावरुनही ते चर्चेत राहिले. शेवटी त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

दत्ता भरणेंचा विसरभोळेपणा

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजस्व अभियान’ हे सर्वसामान्यांची संबंधित आहे. इतक्या गंभीर विषयावर भरणे यांना या योजनेच्या नावाचा विसर पडला. महाराजस्व अभियान- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाच्या अभियानाचे नावच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विसरले.

दत्तामामांनी भाषणात इतरांना या अभियानाचे नाव विचारले. त्यावर तात्काळ स्टेजवरील महसूल अधिकाऱ्यांनी या अभियानाचे नाव सांगितले. मात्र शेवटपर्यंत राज्यमंत्री भरणे यांना हे नाव घेता आले नाही.

(Solapur ready for third wave of Corona, Oxygen Generation Project at Pandharpur, Inauguration Ceremony by Maharashtra minister Datta Bharne)

हे ही वाचा :

6 खात्यांचा पदभार असलेले राज्यमंत्री जेव्हा अभियानाचे नावच विसरतात, दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरा नव्हे!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.