AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Crime: पंढरपूरचे ‘ते’ प्रकरण मानवतेला काळीमा फासणारे; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

या घटनेने पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून पीडितेचा पती आणि बाप दोघांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Pandharpur Crime: पंढरपूरचे 'ते' प्रकरण मानवतेला काळीमा फासणारे; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
नागपूरमधील अॅसिड हल्ल्याची रुपाली चाकणकरांकडून दखल
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 11:09 PM
Share

पंढरपूर : पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बापाने केलेल्या बलात्कार प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगानेही याबाबत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून मानवतेला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणाची जलदगतीने सखोल चौकशी करण्यात यावी, या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव द्यावा, तसेच पिडीतेच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्वसनासाठी कार्यवाही करून त्यासंदर्भात अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना करीत रुपाली चाकणकर यांनी सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे.

पोलीस अधीक्षकांनी आपल्या स्तरावर या गुन्ह्याचा तपास करुन पिडीत अल्पवयीन मुलीला तत्काळ न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांतील बातम्यांमधून हे गंभीर प्रकरण आपल्या निदर्शनास आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

असे झाले प्रकरण उघड

पंढरपूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांकडून काही महिन्यांपासून बलात्कार सुरु होता. यातून पीडित मुलगी गरोदरही राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे कळताच नराधम बापाने तिचे पुण्यातील एक मुलगा बघून लग्न लावून दिले. विवाहानंतर काही महिन्यांनी मुलीला त्रास होऊ लागल्याने ती माहेरी आली. त्यानंतर वडिलांनी तिला पंढरपूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने तिला सोलापूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पतीनेही तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

पती आणि वडिलांवर गुन्हा दाखल

या घटनेने पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून पीडितेचा पती आणि बाप दोघांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (State Women’s Commission takes notice of rape case in Pandharpur)

इतर बातम्या

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपुष्टात, मात्र अद्याप झोनल डायरेक्टर या पदावर कायम

Kalyan Crime: जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.