AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Murder: तिनं हट्टानं अंगठी मागितली, गड्यानं यमसदनी धाडली, प्रियकर, प्रेयसीची बातमी सांगलीत वाऱ्यासारखी पांगली

कडेगाव पोलिसांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये 2022 चे मिसिंग रजिस्टरची पाहणी करुन बेवारस मयताच्या वर्णनाशी मिळते जुळते वर्णनाचे मिसिंगबाबत माहिती घेतली. यानंतर खानापूर येथील बेपत्ता ताई सचिन निकम बलवडी हिचा हा मृतदेह असल्याची खात्री झाली. तर नोतवाईकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे व पैंजण ओळखले.

Sangli Murder: तिनं हट्टानं अंगठी मागितली, गड्यानं यमसदनी धाडली, प्रियकर, प्रेयसीची बातमी सांगलीत वाऱ्यासारखी पांगली
सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराकडून प्रेयसीची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 5:56 PM
Share

सांगली : सोन्याची अंगठी (Gold Ring) मागितली म्हणून प्रियकराने प्रेयसीची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ताई सचिन निकम (32) असे मयत प्रेयसीचे नाव असून ती आधीच विवाहित होती. राहुल सर्जेराव पवार (31) असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. ताईची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह कडेगाव येथील भिवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदीपात्रात फेकून देण्यात आला. याबाबत कडेगाव पोलिसांनी तपास करुन गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक (Arrest) केली आहे. भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ 6 जून रोजी एक महिलेचा मृतदेह तरंगताना नागरिकांनी पाहिले. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी एक 25 ते 30 वयोगटातील स्त्री जातीचे प्रेत नदीपात्रात तरंगत असल्याचे दिसले. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने पोस्टमार्टम जागीच करण्यात आले.

महिलेचे एका ज्वेलर्सच्या मालकासोबत अनैतिक संबंध असल्याचे कळले

कडेगाव पोलिसांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये 2022 चे मिसिंग रजिस्टरची पाहणी करुन बेवारस मयताच्या वर्णनाशी मिळते जुळते वर्णनाचे मिसिंगबाबत माहिती घेतली. यानंतर खानापूर येथील बेपत्ता ताई सचिन निकम बलवडी हिचा हा मृतदेह असल्याची खात्री झाली. तर नोतवाईकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे व पैंजण ओळखले. त्यानंतर सदर मयेतचा पती व नातेवाई यांच्याकडे चौकशी करुन अधिक माहिती घेतली असता मयत ताई निकम ही विटा येथे भाड्याच्या घरी राहत असल्याचे कळले. मयत महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती. महिलेबाबत कसून तपास केला असता मयत ताई निकम हिचे विटा येथील रेणुका ज्वेलर्स मालक राहुल पवार याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे कळले. तसेच मयत ताई निकम व राहुल पवार यांच्या कॉल हिस्ट्रीवरुन राहुल पवार यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

वडिलांना प्रेमसंबंधाबाबत सांगण्याची धमकी दिल्याने हत्या

गेल्या दिड वर्षापासून ताई सचिन निकम हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली राहुलने पोलीस चौकशीत दिली. तिने 3 जून रोजी दुकानात वाढदिवासाकरीता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली. मात्र राहुलने अंगठी न दिल्याच्या कारणावरुन तिने प्रेम संबंधाबाबत त्यांच्या वडिलांना सांगेन असा दम दिला. याच कारणातून 5 जून रोजी राहुल मयत ताईला घेऊन कडेगावजवळ गेला. तिथे रस्त्याच्या कडेला चार चाकी गाडी थांबवून प्रेमसंबंधाबाबत वडिलांना सांगण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन गाडीतच ताईचा गळ्यातील ओढणीने गळा आवळला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदीपात्रात टाकून दिला. याबाबत राहुल पवार याला अटक करण्यात आली आहे. (The boyfriend strangled his girlfriend to death over a gold ring in sangli)

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.