AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर जिल्ह्याला उद्या ‘ऑरेंज अलर्ट’; जिल्ह्यातील नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता, नागरिकांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. | Kolapur Rain

कोल्हापूर जिल्ह्याला उद्या 'ऑरेंज अलर्ट'; जिल्ह्यातील नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता, नागरिकांना सावधानतेचा इशारा
Rain Update
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 3:17 PM
Share

कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय.

नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता

जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या ठिकाणी 22 जुलैला सकाळी 8 वाजेपर्यंत 150 ते 200 मिमी किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांमध्येही 80 ते 125 मिमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वेदगंगा या नद्या आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

पाणी पातळी वाढून धोका पातळीस पोहचण्याची शक्यता

वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार वरील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फूटांची वाढ होवून दि. 23 जुलै रोजी सकाळी 10 वा. पर्यंत ही पाणी पातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नागरिकांनी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावं

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सांगली-कोल्हापूरला थोडासा दिलासा

कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचलेली आहे, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळालेला आहे.

(Tomorrow Kolhapur District Orange alert Meteorological Department)

हे ही वाचा :

Konkan Rain : कोकण, कोल्हापुरात तुफान पाऊस, NDRF ची पथकं रवाना, रस्ते, रेल्वे वाहतूक रखडली

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.