उद्धव सेनेला पुन्हा भगदाड? उदय सामंत यांचा अल्टिमेटम, आज दाखवणार ट्रेलर, शिंदे गटात येणारांची धडाधड यादीच वाचली

Udhav Thackeray- Uday Samant : उद्धव सेनेला मोठे भगदाड पडण्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल्यापासून कोणते नेते शिंदेंच्या गोटात जाणार याची चर्चा रंगली आहे. तर आज रत्नागिरीत उदय सामंत ठाकरे गटाला ट्रेलर दाखवणार आहेत.

उद्धव सेनेला पुन्हा भगदाड? उदय सामंत यांचा अल्टिमेटम, आज दाखवणार ट्रेलर, शिंदे गटात येणारांची धडाधड यादीच वाचली
उदय सामंत, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 9:54 AM

दावोस दौरा गुंतवणुकीपेक्षा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या चर्चेने अधिक गाजला. उद्धव सेनेने उदय सामंत हे शिंदे गोटात बंडाळी करणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे आणि आपल्यात भांडणं लावण्याचा हा पोरखेळ असल्याचे म्हटले होते. तर उद्धव सेनेलाच भगदाड पडणार असल्याचा शड्डू त्यांनी ठोकला. परदेशातून परताच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला अल्टिमेटम दिला. आज रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.

चार आमदार, तीन खासदार शिंदे गटात

विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर उद्धव सेनेतील अनेक नेते शिंदे गटाकडे येणार असल्याचा दावा सामंत यांनी केला. उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. रत्नागिरीत त्याचा पहिला ट्रेलर दाखवणार असल्याचा ते म्हणाले. केवळ उद्धव सेनाच नाही तर काँग्रेसला पण झटका दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसला खिंडार पडणार असल्याचे ते म्हणाले. आज रत्नागिरीत पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुद्धा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीत जय्यत तयारी

उद्योग मंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार आहेत. सामंत उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पडणार आहेत. उद्धव ठाकरे सेनेतील जवळपास 450 कार्यकर्ते उद्धव ठाकरे सेनेला रामराम करणार आहेत. तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशांचा आज दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश होणार आहे.

उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर आज शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा आज पक्षप्रवेश होणार नाही.

दरम्यान जे चार आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत, त्यांची नाव त्यांनी उघड केली नाहीत. तर काँग्रेसमधून कोण येणार याची सुद्धा माहिती समोर आलेली नाही. कालच्या उद्धव सेना आणि शिंदे सेनेच्या मेळाव्याला काही आमदारांनी, खासदारांनी दांडी मारल्यानंतर चर्चेला पेव फुटले एवढे मात्र नक्की.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.