कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून, वाशिमच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल इतर रुग्णांच्या तब्येतीही बिघडत असल्याच्या आरोप नातेवाईकांमधून होत आहे (Washim Hospital Dead Bodies Bed sheet)

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून, वाशिमच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
वाशिममध्ये कोरोनाग्रस्तांचा मृतदेह चादरीत गुंडाळून
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 2:22 PM

वाशिम : कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही बिघडत असल्याचा आरोप केला जात आहे. (Washim COVID Hospital kept Dead Bodies for two days wrapped in Bed sheet)

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही नियम आहेत. मात्र दोन दिवस आधी मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला बेडशीटमध्ये झाकून ठेवलं जात असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

इतर रुग्णांना त्रास होत असल्याची तक्रार

रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या तब्येतीतही बिघडत असल्याच्या आरोप रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे. याआधीही कोरोनाग्रस्त मृतदेह गुंडाळण्यासाठी पैशांची मागणी करणे किंवा कोरोना रुग्ण स्वतः जेवणाचा डबा घेण्यासाठी बाहेर जात असल्याच्या प्रकाराचा पर्दाफाश टीव्ही 9 मराठीने केला होता.

भोपाळमध्ये रहिवासी वसाहतीजवळच मृतदेहावर अंत्यसंस्कार

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भयावह चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमी खचाखच भरल्याने मृतदेहांना अग्नी देण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “अंत्यसंस्कारानंतर चितेला दिलेल्या अग्नीची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कोरोनाबाधित होता, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अनेक मृतदेहांवर एकाच सरणांवर अग्नी

जे चित्र महाराष्ट्रातील उस्मानाबाद, बुलडाण्यात पाहायला मिळालं, तसंच चित्र मध्य प्रदेशातही आहे. स्मशानभूमीमध्ये मृतदेहांची रांग लागली आहे. एकाचवेळी अनेकांना अग्नी द्यावा लागत आहे. त्यामुळेच स्मशानभूमी नेहमीच धगधगती दिसत आहे. 15 एप्रिलला जवळपास 40 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भोपाळ गॅस दुर्घटनेवेळीही भीषणता दिसली होती, मात्र जी दाहकता काल दिसली ती भयावह होती, असं स्थानिक पत्रकार सांगतात.

संबंधित बातम्या :

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट

स्मशानभूमी खचाखच, रहिवाशी कॉलनीतच मृतदेहावर अंत्यसंस्कार, भयावह स्थिती

(Washim COVID Hospital kept Dead Bodies for two days wrapped in Bed sheet)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.