यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एसटी घालण्याचं चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहून गेलेल्या बसमधील दोघाना वाचविण्यात यश आले आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून 1 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. बस कंडक्टकर भीमराव नागरीकर सध्या बेपत्ता आहेत.