Nandurbar ZP : नंदुरबारमधील जिल्हा परिषदेची दोन दिवसांपासून वीज बंद, कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल

ही परिस्थिती जिल्हा परिषदेवर नाहीतर अनेक तहसील कार्यालयांवर पण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालय आहेत.

Nandurbar ZP : नंदुरबारमधील जिल्हा परिषदेची दोन दिवसांपासून वीज बंद, कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल
नंदुरबारमधील जिल्हा परिषदेची दोन दिवसांपासून वीज बंदImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 3:18 PM

नंदुरबार : देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Amrut Mahotsav) साजरा केला जात आहे. त्यासाठी अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद ही विद्युत रोषणाईने भरून निघाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याने रोषणाई नाही. सर्वसामान्य नागरिकांचे देखील काम होत नसल्याचे चित्र समोर आलेलं आहे. जिल्ह्याचे मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा वीज गेल्या दोन दिवसांपासून बंद (Power Supply Off) आहे. कामकाजावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महत्वाची कामे जनरेटरच्या साह्याने केली जात आहेत. जिल्हा परिषद विद्युत पुरवठा (Electric Lighting) बंद आहे. अधिकारी यासंदर्भात बोलायला तयार नाहीत

अधिकारी बोलायला तयार नाहीत

देशात 75 वा स्वतंत्र महोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. घरघर तिरंगा ही मोहीम जोराने जिल्ह्यात राबवले जात आहे. मात्र ज्या ठिकाणावरून या मोहिमेची सुरुवात जिल्ह्यासाठी झाली होती त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नसणार ही बाब अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात आम्ही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या विषयावर कोणीही बोलायला तयार नसून, एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे.

तहसील कार्यालयांवरही थकबाकी

ही परिस्थिती जिल्हा परिषदेवर नाहीतर अनेक तहसील कार्यालयांवर पण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालय आहेत. त्या सहा तहसील कार्यालयांवर एकूण थकबाकी 14 लाख 19 हजार 777 रुपये एवढी आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात तहसील कार्यालयांवर देखील वीज पुरवठा खंडित होण्याची नामुष्की येऊ शकते. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय यंत्रणा असलेल्या कार्यालयाची वीज गुल होत असेल तर सर्वसामान्यांच्या कामांचे काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.