महाराष्ट्रातल्या या 12 जणांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीर, अभिनेता मनोज वाजपेयी, ज्येष्ठ अभिनेते कादर खान (मरणोत्तर), शंकर महादेवन, प्रभूदेवा, फुटबॉलपटू सनील छेत्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह 94 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या रत्नांचाच दबदबा दिसत आहे. कारण, 112 नावांमध्ये तब्बल …

महाराष्ट्रातल्या या 12 जणांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीर, अभिनेता मनोज वाजपेयी, ज्येष्ठ अभिनेते कादर खान (मरणोत्तर), शंकर महादेवन, प्रभूदेवा, फुटबॉलपटू सनील छेत्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह 94 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या रत्नांचाच दबदबा दिसत आहे. कारण, 112 नावांमध्ये तब्बल 12 नावं महाराष्ट्राचे आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. विशेष म्हणजे ज्या चार जणांना पद्मविभूषण जाहीर करण्यात आलाय, त्यामध्ये दोन जण महाराष्ट्रातले आहेत.

महाराष्ट्रातले पुरस्कारार्थी

पद्मविभूषण

अनिल कुमार नाईक

बाबासाहेब पुरंदरे

पद्मभूषण

डॉ. अशोक कुकडे

पद्मश्री

मनोज वाजपेयी

दिनयार कॉन्ट्रॅक्टर

सुदाम काटे

वामन केंद्रे

रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे (संयुक्तपणे)

शंकर महादेवन

नागिनदास सांघवी

शब्बीर सय्यद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *