AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलंच! मुलाला क्रिकेटचं वेड, बापाने 5 एकर द्राक्षाची बाग उपटून स्टेडियम उभारलं

पंढरपुरातील एका बापाने मुलाची क्रिकेटची हौस पूर्ण करण्यासाठी पाच एकर वावरात क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

ऐकावं ते नवलंच! मुलाला क्रिकेटचं वेड, बापाने 5 एकर द्राक्षाची बाग उपटून स्टेडियम उभारलं
Pandharpur cricket stadium
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 5:31 PM
Share

पंढरपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या दीड महिन्यापासून राज्यामध्ये संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकही घरी बसून आपल्या आवडी निवडीला वाव देताना दिसतात. मात्र पंढरपुरातील एका बापाने मुलाची क्रिकेटची हौस पूर्ण करण्यासाठी पाच एकर वावरात क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नुसता निर्णयच घेतला नाही तर चक्क स्टेडियम बांधण्यास सुरुवातदेखील केली आहे. (Pandharpur | father built a cricket stadium for his son could play cricket)

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे राहणारे बागायतदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मुलाचे लॉकडाऊनमुळे क्रिकेट खेळ बंद झालं असल्याने चक्क पाच एकर द्राक्षबाग उपटून क्रिकेट स्टेडियमचे काम सुरु केले आहे. मुलाच्या क्रिकेटवेडापाई बापानं चक्क आपल्याच शेतात स्टेडियम उभारण्यास सुरुवात केली आहे.

भारतीयांचे क्रिकेट वेड हे जगाला माहिती आहे. त्यातच ग्रामीण भागातील तरुणांना प्रतिभा असतानाही भारतीय क्रिकेट संघात खेळण्यास संघी मिळत नाही. आपल्या मुलाचा क्रिकेट खेळता यावं, सराव करता यावा यासाठी राजेंद्रसिंह सूर्यवंशी यांनी चक्क पाच एकरात स्टेडियम बांधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्रिकेट स्टेडियम साधेसुधे नसून अत्याधुनिक सोयीयुक्त असणार आहे.

या स्टेडियममध्ये एकूण पाच खेळपट्ट्या असणार आहेत. या खेळपट्ट्या सिमेंटचा वापर करुन बांधल्या आहेत. त्यामुळे मुलाला कसून सराव करता येईल. त्यासाठी मुंबईतील ज्येष्ठ पिच क्युरेटर महामुणकर यांना बोलावण्यात आले होते. त्यांनीही खेळपट्टीची पाहणी केली आहे. पिच क्युरेटर यांच्या सल्ल्यानुसार स्टेडियमची बांधणी जोरात सुरू आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी दररोज 50 कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत असतो.

सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश हा सध्या कोल्हापूर मधील इब्राहिम पटेल यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. अभियशची यापूर्वी नंदुरबार जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धत निवड झाली आहे. पुण्यातील काही स्पर्धत त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. पुढे जाऊन त्याला क्रिकेटमध्ये करियर करायचे असल्याचे त्याने सांगितले.

मुंबई-पुण्यातील क्रिकेट स्टेडियमप्रमाणे पाच एकरावर लोन तयार करण्यात आले आहे. आपल्या मुलासह ग्रामीण भागातील प्रतिभावंत क्रिकेटपटू देशाला देता येतील, या भावनेने स्टेडियमची बांधणी कोणताही खंड पडू न देता सुरु आहे.

सोलापुरातील पहिलंच स्टेडियम

असे म्हणतात की, हौसेला मोल नसते, त्याचप्रमाणे मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळावी यासाठी बापाने चक्क स्टेडियम उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा फायदा ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींनादेखील होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात असे क्रिकेटचे स्टेडियम कुठेच नाही त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा मोठ्या शहरामध्ये सराव करण्यासाठी जावे लागत होते. मात्र मुलाच्या प्रेमापोटी सुर्यवंशी यानी बांधलेले स्टेडियम हे ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमीना नक्कीच फायद्याचे ठरणार असल्याचे क्रिकेट प्रशिक्षक बडवे यानी सांगितले.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

“कर्णधार म्हणून विराटने ICC ची एकही ट्रॉफी जिंकली नाही पण…”

चॅपेल म्हणाले, ‘आताच्या घडीचा अश्विन सर्वश्रेष्ठ गोलंदाज’; मांजरेकर म्हणाले, ‘मी सहमत नाही!’

हैदराबादचा ‘हा’ फलंदाज सानिया मिर्झाचा काका, भारत सोडून पाकिस्तानला गेला, 9 व्या क्रमांकावर शतक झळकावलं!

(Pandharpur | father built a cricket stadium for his son could play cricket)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.