चॅपेल म्हणाले, ‘आताच्या घडीचा अश्विन सर्वश्रेष्ठ गोलंदाज’; मांजरेकर म्हणाले, ‘मी सहमत नाही!’

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल (Ian Chappell) यांनी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आर अश्विनची (R Ashwin) तारीफ केली. चॅपेल यांनी अश्विनला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज म्हटलं आहे.

चॅपेल म्हणाले, 'आताच्या घडीचा अश्विन सर्वश्रेष्ठ गोलंदाज'; मांजरेकर म्हणाले, 'मी सहमत नाही!'
संजय मांजरेकर आणि रवीचंद्रन अश्विन
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 9:53 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल (Ian Chappell) यांनी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आर अश्विनची (R Ashwin) तारीफ केली. चॅपेल यांनी अश्विनला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज म्हटलं आहे. मात्र, भारताचा माजी फलंदाज तथा क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjekar) इयान चॅपल यांच्या मताशी सहमत नाहीत. त्यांनी हे मानायला नकार दिला. संजय मांजरेकर यांनी काही उदाहरणं देत अश्विनपेक्षा आणखी गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट खेळ करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं. (Australia Ian Chappell Appriciate R Ashwin Sanjay Manjrekar objection)

चॅपेल यांच्या तोंडी अश्विनची तारीफ, मांजकेरांना मात्र मान्य नाही!

अश्विनपेक्षा इतर गोलंदाज कामगिरीने कसे उजवे आहेत, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न संजय मांजरेकर यांनी केला. ESPN क्रिक इन्फोच्या ‘रनऑर्डर’ या विशेष कार्यक्रमात मांजरेकर यांनी अश्विनच्या परदेशातल्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘रवींद्र जडेजा आणि अलीकडे दमदार कामगिरी केलेल्या अक्षर पटेल यांच्यासारख्या फिरकीपटूंनीही भारतीय मैदानांवर आपल्या बोलिंगने कमाल केलीय’, असं मांजरेकर म्हणाले.

मांजरेकर यांच्या मतावर चॅपेल यांनी वेस्ट इंडीजचे महान जलदगती गोलंदाज जोएल गार्नर यांची योगदानाची आठवण करून दिली. संघात इतर अनेक चांगले गोलंदाज असल्याने त्यांच्या विकेट कमी आहेत, परंतु त्याच्यामुळे त्यांच्यातली प्रतिभा कमी होत नाही. ते इतर खेळाडूंपेक्षा सरसच होते, असं चॅपेल म्हणाले.

मांजरेकरांचं मत काय?

जेव्हा लोक अश्विनला सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणतात, तेव्हा मला एक प्रॉब्लेम आगे. अश्विनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया देशांमध्ये एकदाही पाच विकेट्स घेतल्या नाहीत. जेव्हा आपण भारतीय खेळपट्ट्यांवरील जबरदस्त कामगिरीकडे पाहतो तेव्हा तुमच्या नजरेसमोर जाडेजाचं नाव असायला हवं. जडेजाने गेल्या चार वर्षात जवळजवळ अश्विनच्या तोडीस तोड विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या मालिकेत अक्षर पटेलने अश्विनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनचं मोठेपण सांगताना चॅपेल यांनी वेस्ट इंडिजच्या बोलर्सची आठवण काढली!

चॅपेल यांनी मांजरेकरांच्या मताशी असहमती दर्शवत त्यांना गार्नरच्या कारकिर्दीची आठवण करुन दिली. ते म्हणाले, गार्नरने बऱ्याचदा वेळा पाच विकेट घेतल्या नाहीत. जेव्हा आपण त्याचे रेकॉर्ड पाहतो तेव्हा तो कदाचित प्रभावी दिसत नाही. कारण त्या संघात आणखी तीन चमकदार गोलंदाज होते.पण त्यामुळे त्यांच्यात क्षमता आणि प्रतिक्षा कमी होते, असं आपण म्हणू शकत नाही, असं चॅपेल म्हणाले.

(Australia Ian Chappell Appriciate R Ashwin Sanjay Manjrekar objection)

हे ही वाचा :

वसीम अक्रम, ज्याने भल्याभल्या दिग्गजांना आऊट केलं, तो बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीसमोर बोल्ड झाला होता?

हैदराबादचा ‘हा’ फलंदाज सानिया मिर्झाचा काका, भारत सोडून पाकिस्तानला गेला, 9 व्या क्रमांकावर शतक झळकावलं!

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराबद्दल ब्रेट लीचं आश्चर्यचकित करणारं मत, म्हणाला, ‘मला माहिती असायचं…’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.