पंढरपूरजवळ टेम्पो-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, पाच वारकऱ्यांवर काळाचा घाला

पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील मांजरी गावाजवळ वारकरी प्रवास करत असलेल्या टेम्पोची विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली.

पंढरपूरजवळ टेम्पो-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, पाच वारकऱ्यांवर काळाचा घाला

पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या पाच वारकऱ्यांवर काळाने घाला घातला. टेम्पो आणि ट्रॅक्टरच्या धडकेत बेळगावच्या पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला. सांगोल्याजवळील मांजरी भागात टेम्पो आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात (Pandharpur Varkari Accident) झाला.

कर्नाटकातील बेळगावजवळील मंडोळी आणि हंगिर्गे गावातील अकरा वारकरी टेम्पोने पंढरपूरकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील मांजरी गावाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने टेम्पोला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती यामध्ये पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

कृष्णा वामन कनबरकर, महादेव कनबरकर, यल्लापा देवाप्पा पाटील, अरुण दतात्रेय मुतकेकर, लक्ष्मण आंबेवाडीकर यांना अपघातात प्राण गमवावे लागले. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघाताची (Pandharpur Varkari Accident) माहिती कळतात बेळगावमधील मंडळे आणि हंगिर्गे गावातील ग्रामस्थ पंढरपूर आणि चांगल्याकडे येण्यास निघाले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने जातात. आषाढीप्रमाणेच कार्तिकीलाही विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापूजेचा प्रघात आहे.

पंढरपुरात चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला दोन प्रश्न

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *