पंकजा मुंडे जेव्हा चिमुकल्यांची शाळा घेतात

पंकजा मुंडे जेव्हा चिमुकल्यांची शाळा घेतात
सध्या कोरोनाची साथ असल्यामुळे पंकजा मुंडे या मुलींना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचे फायदे समजावून सांगत आहेत.

पंकजा मुंडे या मंगळवारी बीडमधील माजलगाव येथे एका शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी गेल्या होत्या. | Pankaja Munde

Rohit Dhamnaskar

|

Jan 26, 2021 | 11:42 PM

बीड: भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंकजा मुंडे शाळेतील दोन लहान मुलींशी संवाद साधताना दिसत आहेत. सध्या कोरोनाची साथ असल्यामुळे पंकजा मुंडे या मुलींना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचे फायदे समजावून सांगताना दिसत आहेत. (Pankaja Munde interact with school girls in beed)

पंकजा मुंडे या मंगळवारी बीडमधील माजलगाव येथे एका शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी शाळेतील या दोन चिमुकल्या मुलींशी आपुलकीने संवाद साधला. या मुलीही पंकजा मुंडे यांच्या प्रश्नांना हजरजबाबीपणे उत्तर देताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावर थांबतात तेव्हा…..

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. इंदापुरातील त्यांच्या साधेपणाच्या एका कृतीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भरणे (Dattatray Bharane) यांना मंत्रीपद दिले तरीही त्यांनी त्यांचा साधेपणा सोडलेला नाही.

एरवी मंत्री म्हटलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफ़ा आणि त्यातून सर्व सामान्य कार्यकर्त्यांची होणारी अवहेलना असे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळते. परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सर्व गोष्टींचा बडेजाव न करता आज इंदापुरात रस्त्यावरच कार्यकर्त्यांच्या घोळक्यात चहा घेत मंत्री झाल्यानंतर देखील आपला साधेपणा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

पृथ्वीराजबाबा मानलं… जखमी आजीबाईंना स्वत:च्या गाडीतून पोहोचवलं रुग्णालयात

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याबाबत सोमवारी घडलेल्या एका किस्स्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पृथ्वीराज चव्हाण सोमवारी कराडच्या सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून परतत असताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले.

यावेळी चौकशी केली असता या रस्त्यावर झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जखमी झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांना समजले. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी गाडीतून खाली उतरत वृद्धेची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील एक गाडी देऊन या वृद्ध महिलेला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

संबंधित बातम्या:

Pankaja Munde | … आणि पंकजा मुंडे हळहळल्या

पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये, दोन फोटोंसह नवा किस्सा शेअर

VIDEO : माजी मंत्री पंकजा मुंडे अचानक ‘गारवा’ रसवंती गृहात

(Pankaja Munde interact with school girls in beed)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें