पार्थ पवार प्रकरणातील शीतल तेजवानीच्या अटकेसाठी टाळाटाळ? बावधन पोलिस पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात, नेमकं कारण काय?
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलिसांशी भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. ते शीतल तेजवानीच्या अटकेसाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जमीन खरेदी प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले आहे. पार्थ पवार यांची कंपनी अमेडियाला पुण्यातील मोक्याची 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांत कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, शीतल तेजवानीला टकेसाठी दिरंगाई केली जात असल्यामुळे बावधन पोलिसांवर पुन्हा संशय व्यक्त केला जात आहे.
बावधन पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलिसांशी भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून तिच्या अटकेसाठी दिरंगाई केली जातीये? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, याच बावधन पोलिसांकडे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास आहे.
कारण काय?
वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यावेळी ही अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेसह दिर सुशील हगवणेच्या अटकेसाठी टाळाटाळ करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांवर जसा राजकीय दबाव होता, तसाचं आता ही दबाव असणार हे साहजिक आहे. त्यामुळेच शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अटकेची दिरंगाई केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तक्रारीत पार्थ पवार यांचं नाव का नाही ?
दस्त नोदंणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन जणांवर गुन्हा दाखल झालाय. पार्थ पवारांच्या चौकशीनतंर सगळया गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तक्रारीत पार्थ पवार यांचं नाव का नाही ? त्यावर अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘आमच्या दस्तावर ज्या पार्टी आहेत, ज्यांची नावं टाकून सह्या आहेत, त्यांच्याविरुद्ध तक्रार केलीय’
पार्थ पवार प्रकरणावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पार्थ पवारांच्या दोन्ही कंपन्यांचा पूर्ण वेलेंटसीटच्या किस केला. रेवेन्यू झिरो, टोटल इन्कम झिरो असा असताना सात ते आठ रुपये त्यांना तोटा म्हणजे या कंपनीत काहीही नाहीये. अशी कंपनी जमीन कसा घेऊ शकते? हा पहिला प्रश्न. दुसरा त्यांच्यावर जे FIR झाला आहेत. त्याच्यावर आजच मी पत्र ड्राप करून पाठवणार.. कारण अथॉरिटी लेटर ज्या व्यक्तीला दिले आहेत त्यांचे काम फक्त दिलेले काम करणं आहे. त्यांच्या लीगल जे आहे सगळं पार्थ पवारांवर आहे’ असे त्या म्हणाल्या.
