AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावावर डान्सबार? किती बारबाला ताब्यात?; रामदासभाईंची पहिली प्रतिक्रिया काय?

योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे, असा दावा परब यांनी केला होता, त्यावर आता कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावावर डान्सबार? किती बारबाला ताब्यात?; रामदासभाईंची पहिली प्रतिक्रिया काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 2:48 PM
Share

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल विधान परिषदेत  केला होता, त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. मालकाला खूश करण्यासाठी रामदास कदमला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधीमंडळ कायदे मंडळ आहे. नियमाने काम चालतं पण परब यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे मी सभापतींना पत्र देतोय की चुकीचे नियम दाखवून एखाद्या राज्यमंत्र्याला बदनाम करता येतं का. केलं असेल तर अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  १९९० पासून सावली बार सुरू आहे. माझ्या पत्नीच्या नावे आहे. व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण नाही. शेट्टी नावाच्या व्यक्तीला ३० वर्षांपासून ते चालवायला दिलं आहे. या ३० वर्षात आम्ही तिथे पायही ठेवला नाही. पण तिथे १४ महिलांचं परमिशन आहे वेटरसाठी, डान्सबार नाही. तो डान्सबार नाही. अनिल परब यांनी डान्सबार आहे सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तो चुकीचा आहे. पोलिसांनी पाहणी केली तेव्हा एका गिऱ्हाईकाने लेडीज वेटरवर पैशाची उधळण केल्याचं कळलं. म्हणून आम्ही ताबडतोब शेट्टीला बाहेर काढलं. त्याच्यावर कारवाई केली. मुलींचं वेटरचं लायसन्स रद्द केलं. आम्ही आर्केस्ट्राचं लायसन्स होतं तेही रद्द केलं. आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते हॉटेलही बंद केलं. अशा पद्धतीने घाणेरड्या डान्सबारचे पैसे आम्ही घेत नाही.

मी त्याबाबत माहिती घेतली. अशा पद्धतीने मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्ट लायसन्स होल्डर हा जबाबदार असतो. पण नव्या अ‍ॅक्टमध्ये म्हणजे ऑस्किन डान्स इन होटल अ‍ॅक्ट 2016 च्या कलम ८नुसार जो माणूस हॉटेल किंवा बार चालवतो त्याचीच सर्व गोष्टीची जबाबदारी असते. अ‍ॅग्रीमेंटवर हॉटेल किंवा बार चालवतो त्याची जबाबदारी असते. मालकाची जबाबदारी नसते. हेतुपुरस्सर माझ्या पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तो डान्सबार नव्हता. डान्सबार तिथे नव्हता. फक्त आर्केस्ट्रा होता. १४ मुलींचं लायसन्स आहे. नाईटला काम करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्या २२ दाखवल्या. त्याची चौकशी करण्यास सांगितलं.

मी सर्व लायसन्स पोलिसांना दिले. यापेक्षा अजून काय करणार. अनिल परब यांच्यासाठी नियम बदलणार का? मालक जबाबदार नाही. चालक जबाबदार आहे. कायद्यात म्हटलं आहे. मग रामदास कदमांच्या पत्नीला बदनाम करण्यासाठी नियम बदलणार का. रामदास कदमांच्या पत्नीने व्यवसाय करणं गुन्हा आहे का. जो कायदा आहे. त्यानुसार जो चालवणारा इसम जबाबदार असतो. त्याला जबाबदार धरलं. हॉटेल काढून घेतलं. लायसन्स रद्द केलं आहे. हॉटेल बंद केलं आहे. यापेक्षा अजून नैतिक काय करायचं? असा सवाल यावेळी कदम यांनी केला आहे.

रामदास कदम यांच्या पत्नीला अडचणीत टाकायचं असेल तर नियम बदलावा लागेल. नियमाने चालणार की अनिल परब म्हणतात ते करायचं. परब यांनी चुकीचं कलम सांगितलं. त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे परबांवर कारवाई होणार की नाही हे आम्ही पाहणार आहोत.  अनिल परब यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी चुकीचा कायदा सांगितला, आणि आमची बदनामी केली, असं कदम यांनी म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.