रायगड येथे पोलीस निरीक्षकाची कार उलटून भीषण अपघात

महाड येथील महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात (Police inspector car accident mahad)  महाडमधील उद्योजक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रायगड येथे पोलीस निरीक्षकाची कार उलटून भीषण अपघात

रायगड : महाड येथील महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात (Police inspector car accident mahad)  महाडमधील उद्योजक यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पोलीस निरीक्षक आणि इतर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही घटना काल (12 नोव्हेंबर) महाडमधील गोंडाळे फाट्याजवळ (Police inspector car accident mahad) घडली.

या भीषण अपघातात महाडमधील प्रसिद्ध उद्योजक नितीन मेहता यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच महाड शहर पोलीस निरीक्षक शैलेस सणस यांच्यासह आणखी दोघे जखमी असून त्यांच्यावर महाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही कार महाड येथून रायगड येथील लाडवली या गावी जात असताना हा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील नाल्यात कार पलटी झाली. यावेळी जोराचा फटका कारमध्ये बसलेले उद्योजक मेहता यांना लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, रायगड महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. रात्रीच्या दरम्यान महामार्गावर सर्व गाड्यांचा वेग अधिक असतो. तसेच गाडी चालवातना अेकांचे नियंत्रण सुटल्याने येथे अपघात झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *