AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : पाऊस आलारे; या जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार, धो -धो कोसळणार, पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, परंतु अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. राज्यात चांगला पाऊस कधी होणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज आता समोर आला आहे.

Monsoon update : पाऊस आलारे; या जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार, धो -धो कोसळणार, पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 8:25 PM
Share

राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे. मात्र पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाचा एक थेंबही पडलेला नाहीये. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या 20 जूनंतर मंद झालेली मान्सूनची वाटचाल पुन्हा वेग पकडेल असा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात वीस तारखेनंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आता या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील नवा मान्सून अंदाज (Panjabrao Dakhs monsoon forecast)  समोर आला आहे.

काय आहे नवा अंदाज 

महाराष्ट्रात सध्या वारं सुटलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले, आणि मला त्यांनी विचारलं हे वार कधीं थांबणार आहे? तर सर्वप्रथम हे वारं कधी बंद होणार आहे, याचा आधी खुलासा करतो. काही ठिकाणी 19 जूनला हे वारं बंद होईल तर काही ठिकाणी 20 जूनला हे वारं बंद होईल, तर काही ठिकाणी 21 जूनला हे वारं बंद होणार आहे. ज्या ठिकाणी 19 ला वारं बंद झालं तर तिथे लवकर पाऊस येईल. मात्र महाराष्ट्रातील सर्व ठिकाणाचं वार हे 21 जूनपर्यंत बंद होणार आहे, हे लक्षात घ्या. वीस जूननंतर राज्यात उष्णतेची लाट देखील कमी होणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अनेक शेतकऱ्यांना यंदा राज्यात दुष्काळ पडेल अशी भीती आहे, परंतु मनातून दुष्काळाची भीती काढून टाका, राज्यात कुठेही दुष्काळ पडणार नाहीये. जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहे, एवढं मात्र नक्की.

काही जणांच्या पेरण्या या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होतील, तर जे शेतकरी यातून सुटतील तर त्यांच्या पेरण्या या 10 जुलै ते 15 जुलैदरम्यान होतील. कारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार आहे. हा पाऊस विदर्भातून येणार आहे. मान्सून जेव्हा केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे सरकरून जेव्हा महाराष्ट्रात स्थिरावतो, तेव्हा जर उभं वारं सुटलं तर अशा स्थितीमध्ये पूर्वेकडूनच पाऊस येतो. महाराष्ट्राच्या पूर्वेला विदर्भ आणि तेलंगणा आहे, त्यामुळे यंदा तिकडूनच महाराष्ट्रात पाऊस येणार आहे, जुनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत. महाराष्ट्रात एकाचवेळी सर्वत्र पाऊस पडणार नाही, परंतु काही भागात 21 जूनला पाऊस पडेल, काही भारात 22 काही भागात 23 तर काही भागात 24 जूनला पाऊस पडेल असं करता, करता संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापून जाईल, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की, विदर्भात थोडी लवकर पावसाला सुरुवात होईल, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. त्यानंतर पश्चिम विदर्भात पाऊस हजेरी लावेल, त्यानंतर मराठवाड्यात चांगला पाऊस होईल आणि सर्वात शेवटी उत्तर महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Follow Us
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?