AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : पंतप्रधान मोदींची आज चाळीसगावच्या विद्यार्थ्यांशी ‘मन की बात’; पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांशीही साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची मन की बात महाराष्ट्रासाठी खास असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

PM Modi :  पंतप्रधान मोदींची आज चाळीसगावच्या विद्यार्थ्यांशी 'मन की बात'; पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांशीही साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: tv9
| Updated on: Aug 28, 2022 | 9:42 AM
Share

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमामधून देशातील नागरिकांशी सवांद साधत असतात. ते मन की बातमधून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवतात तसेच नागरिकांची मत देखील जाणून घेतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पुन्हा एकदा मन की बातमधून संवाद साधणार आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मन की बात आज महाराष्ट्रासाठी खास असणार आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.  या कार्यक्रमाला खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे.

उत्सुकता शिगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधात असतात. आज मोदींची मन की बात विशेष असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी तसेच पीएम आवासच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह  खासदार उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलणार? विद्यार्थी त्याच्यांशी कसा संवाद साधणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. काही वेळातच मन की बात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

व्होकल फॉर लोकल

दरम्यान या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खादी उत्पादनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्याकडे कपडे खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वजन खादी उत्पादनाला प्राधान्य द्या. सणोत्सवाच्या काळात आपल्या नातेवाईकांना खादीपासून तयारे केलेले कपडे भेट द्या. यामुळे  व्होकल  फॉर लोकल चळवळ अधिक मजबूत होईल. स्थानिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा  व्होकल फॉर लोकलवर बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.