कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा

कोरोना साथीच्या आजारामुळे (CoronaVirus) तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील तुरूंगातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा
तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 8:07 PM

अमरावती : कोरोना साथीच्या आजारामुळे (CoronaVirus) तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील तुरूंगातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कैदी पॅरोलवर त्यांच्या घरी पोहोचले, पण आता रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कैदी पुन्हा तुरुंगात जाण्यास तयार झाले आहेत. (Prison administration releases thousands of prisoners on parole due to Corona, prisoners wants to go back to jail over employment issues)

2010 मध्ये अमरावतीच्या मंगरूळ चवाळा गावात वादाच्या वेळी विरोधी गटातील एका मृतदेह त्यांच्या शेतात सापडल्यानंतर अनंत चवाळे आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली होती. अनंत आणि त्याच्या भावाला 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला. अनंत चवाळे 2013 पासून अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मे 2020 मध्ये त्याला पॅरोलवर घरी सोडण्यात आले.

अनंत, त्यांची पत्नी आणि 12 वर्षांचा मुलगा जो मानसिक आजाराने त्रस्त आहे, असे तिघे भाड्याच्या एका खोलीत राहतात. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्य सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले, पण त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. पॅरोलवर सुटलेल्या कैद्याकडे समाजाचा दृष्टीकोन चांगला नाही. त्यांना रोजगार देण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे आता त्या कैद्यांना वाटते की त्यांच्यासाठी तुरूंग चांगला आहे.

अनंतची पत्नी आपल्या एका अपंग मुलासह भाड्याने घेतलेल्या एका खोलीत राहते, काही घरगुती कामे करुन तिला महिन्याला 2300 रुपये मिळतात. 2300 रुपयांमध्ये मुलाला आणि पतीला सांभाळणे तिच्यासाठी कठीण झाले आहे, त्यामुळे तिलाही असे वाटते की, नवरा तुरूंगात राहिला तर बरा.

पॅरोलवर असलेल्या कैद्यांना रोजगार द्यावा

गेल्या काही वर्षांपासून कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारे वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवी वैद्य सध्या पॅरोलवर असलेल्या कैद्यांना आणि इतर गरजूंना दररोज विनामूल्य भोजन पुरवतात, परंतु जर सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले मात्र त्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. सरकारने त्यांना रोजगार किंवा काही पॅकेज द्यावे अशी मागणी वैद्य यांनी केली आहे.

इतर बातम्या

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूवर पोलीस अधिकाऱ्याचा बलात्कार, पंजाब पोलिसात मोठी खळबळ

(Prison administration releases thousands of prisoners on parole due to Corona, prisoners wants to go back to jail over employment issues)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.