पूजा चव्हाण प्रकरणात लक्ष घाला, अन्यथा रस्त्यावर उतरू; तृतीय पंथीयांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला अकरा दिवस झाले तरी या प्रकरणाचं गूढ अद्याप उकलेलं नाही. (priti mauli laturkar reaction on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण प्रकरणात लक्ष घाला, अन्यथा रस्त्यावर उतरू; तृतीय पंथीयांचा इशारा
पूजा चव्हाण

बीड: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला अकरा दिवस झाले तरी या प्रकरणाचं गूढ अद्याप उकलेलं नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ज्या कथित मंत्र्यांवर आरोप झालेत त्यांनीही पुढे येऊन कोणताच खुलासा केलेला नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर तृतीय पंथी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने पूजा चव्हाण प्रकरणात लक्ष घालावं, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा तृतीय पंथीयांनी दिला आहे. (priti mauli laturkar reaction on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण प्रकरणावर तृतीय पंथी प्रबोधनकार प्रीती माऊली लातूरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आज अकरा दिवस पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप मृत्यूचे कारण समोर आले नाही. ज्यांच्यावर आमच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच अत्याचार होतो हे दुर्दैवी असल्याचं मत तृतीय पंथीय प्रबोधनकार प्रीती माऊली लातूरकर यांनी व्यक्त केलं आहे.

तृतीय पंथी आक्रमक

राज्य सरकारनं पूजा चव्हाण प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अन्यथा तृतीय पंथीय समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रीती माऊली लातूरकर यांनी दिला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही. (priti mauli laturkar reaction on Pooja Chavan Suicide Case)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : श्रीमती पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात!  

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल, राज्य सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह 

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

(priti mauli laturkar reaction on Pooja Chavan Suicide Case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI