AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीसाठी कोकणात एसटीच्या 250 जादा बसेसची सोय

कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अडीचशे जादा बसेसची सोय केली आहे.सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

होळीसाठी कोकणात एसटीच्या 250 जादा बसेसची सोय
MSRTC (1)Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 07, 2023 | 7:12 PM
Share

मुंबई :  होळीनिमित्त कोकणात ( KONKAN ) जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने ( MSRTC ) नियमित बसेस शिवाय 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा गाड्या 3 ते 12 मार्च दरम्यान  कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. होळीचा सण कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महामंडळाने ही सोय केली आहे.

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा 250  जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या गर्तेत सापडली आहे. एसटीने गणपती सणाच्या हंगामातही कोकणासह इतर भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी दोन हजाराहून अधिक जादा गाड्या सोडल्या होत्या. परंतू तरीही यापासून एसटीच्या तिजोरीत फारशी भर पडली नाही. आता होळीचा हंगाम तरी एसटी महामंडळाला फळणार का ? असा सवाल केला जात आहे.

येथून सुटणार जादा गाड्या 

कोकणात होळीच्या सणासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून अडीचशे गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात एसटीचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल आगार, परळ आगार, कुर्ला आगार , बोरिवली , ठाणे , वसई आगार , नालासोपारा आगार तसेच पनवेल आगारातून कोकणातील  खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ऑनलाईन आरक्षणाचीही सोय

कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी जादा बसेसच्या आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.