एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेतील हा नेता भावी मुख्यमंत्री, पुण्यात लागले शुभेच्छा देणारे बॅनर

Pune News | पुणे शहरातील पाट्या आणि बॅनर प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची चर्चा होते असते तसेच बॅनरची चर्चा होते. पुणे शहरात अनेक जणांसाठी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले गेले आहेत. आता त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची भर पडली आहे.

एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेतील हा नेता भावी मुख्यमंत्री, पुण्यात लागले शुभेच्छा देणारे बॅनर
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 8:34 AM

अभिजित पोते, पुणे | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार असणार आहेत. परंतु विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणखी एका व्यक्तीचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी पुढे आणले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे.

तानाजी सांवत यांचे बॅनर

पुणे शहरातील पाट्या आणि बॅनर प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची चर्चा होते असते तसेच बॅनरची चर्चा होते. पुणे शहरात अनेक जणांसाठी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले गेले आहेत. आता त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची भर पडली आहे. तानाजी सावंत यांना संघर्ष सेनेचे संतोष साठे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तानाजी सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केला आहे. त्यांनी पुणे शहरात लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील कात्रज चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे.

तानाजी सावंत यांचे लागलेले बॅनर

लोकसभेच्या रणधुमाळीत बॅनरची चर्चा

पुण्यात भाजपने लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रचारास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर तानाजी सावंत यांचे लागलेले बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अजित पवार यांनी आपली महत्वकांक्षा मुलाखतीच्या माध्यमातून आणि जाहीर भाषणांमधून बोलून दाखवली आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.