AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 31, 32 मध्ये राष्ट्रवादी, भाजपात काटे की टक्कर, यावेळी कोण मारणार बाजी?

Pune Election Results 2026 LIVE: पुण्याच्या प्रभाग क्रमांक 31 आणि 32 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात चुरस पहायला मिळत आहे. गेल्यावेळी या दोन प्रभागामधील 8 जागांपैकी, तीन जागा या भाजपला मिळाल्या होत्या, तर पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 31, 32 मध्ये राष्ट्रवादी, भाजपात काटे की टक्कर, यावेळी कोण मारणार बाजी?
pune Election Results 202Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:10 PM
Share

गेल्या निवडणुकीत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं. तब्बल 97 जागा या महापालिका निवडणुकीत भाजपानं जिकंल्या होत्या, पुण्यातील असे अनेक प्रभाग होते, जिथे चारही जागा भाजपला मिळाल्या होत्या, मात्र प्रभाग क्रमांक 31 आणि 32 मध्ये वेगळी परिस्थिती होती. या दोन्ही प्रभागामध्ये गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा पहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 31 मध्ये करवे नगर या भागाचा समावेश होते, गेल्यावेळी या प्रभागात तीन जागा भाजपला तर एक जागा या राष्ट्रवादीला मिळाली होती. तर प्रभाग क्रमांक 32 मध्ये मात्र चारही जागांवर राष्ट्रवादीच्याच उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. या प्रभागात भाजपला खातं देखील उघडता आलं नव्हतं, दरम्यान यावेळी या दोन्ही वार्डात काय होणार? कोण बाजी मारणार? याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक 31 – प्रभाग क्रमांक 31 मध्ये करवे नगरचा समावेश होतो, या प्रभागात गेल्यावेळी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता, तर तीन जागा भाजपला मिळाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 31 अ मधून भाजपचे उमेदवार सुशील शिवराम मेंगडे हे विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 31 ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी दुधाने या विजयी झाल्या होत्या. तर क मधून भाजपच्या उमेदवार वृषाली चौधरी या विजयी झाल्या आणि ड मधून देखील भाजपचेच उमेदवार राजाभाऊ बराटे यांनी बाजी मारली होती.

पुणे महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

प्रभाग क्रमांक 32 – प्रभाग क्रमांक 32 मध्ये गेल्या निवडणुकीत चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय झाला होता. प्रभाग क्रमांक 32 मध्ये वारजे, माळवाडी या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 32 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बराटे हे विजयी झाले होते. तर ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सायली वांजळे या विजयी झाल्या होत्या, तर क मधून राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप धुमाळ यांनी बाजी मारली, तर प्रभाग क्रमांक 32 ड मधून सचिन दोडके हे विजयी झाले. दरम्यान यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे, काही राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत, त्यामुळे या प्रभागातून कोण बाजी मारणार? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.