4 मोठी शहरं, 5 महत्वाच्या बातम्या

राज्यातील चार मोठ्या शहरातील पाच महत्वाच्या बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे. त्यात पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरातील महत्वाच्या बातम्यांचा समावेश आहे.

4 मोठी शहरं, 5 महत्वाच्या बातम्या
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 9:00 AM

राज्यातील 4 मोठ्या शहरातील 5 महत्वाच्या बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे. नागपूरकरांसाठी मालमत्ता कर योजनेनंतर महापालिकेलनं पाण्यासाठीही अभय योजना राबवली आहे. तर औरंगाबादकरांसाठी नव्या पाणीपुरवठा योजना महागडी ठरण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी तांदूळ महागला असताना नाशिकमध्ये खाद्यतेलाचे दरही लिटरमागे 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर पुणे आणि नागपुरातून कोरोना संदर्भात महत्वाची बातमी आहे. (Four big cities Five important news)

नागपूर:

नागपूर महापालिकेनं शहरवासियांना मोठा दिलासा दिला आहे. नागपूरकरांच्या पाण्यावरील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. महापालिकेनं दोन दिवसांपूर्वीच मालमत्ता करासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता पाणीपट्टी थकबाकीदारांसाठीही अभय योजना लागू केली आहे. 212 कोटी रुपयांच्या थकीत पाणीकराच्या वसूलीसाठी महापालिकेनं ही योजना राबवली आहे. 21 डिसेंबर ते 22 फेब्रुवारी दरम्यान ही योजना राबवली जाणार आहे. तोपर्यंत शहरवासियांना योजनेचा फायदा घेत पाणीपट्टी भरली नाही तर मात्र 22 फेब्रुवारीनंतर महापालिका नळ जोडणी तोडण्याची मोहीम हाती घेणार आहे.

औरंगाबाद:

औरंगाबादकरांना आता 1 हजार लिटर पाण्यामागे 10 रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या पाणीपुरवठा योजनेमुळं औरंगाबादकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. औरंगाबाद शहरात 1 हजार 680 रुपये खर्च करुन नवी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेत औरंगाबादकरांना पाणी जास्त दराने मिळणार आहे. यापूर्वी पाण्यासाठी वर्षाला 14 हजार रुपये मोजावे लागत होते. पण आता 1 हजार लिटर पाण्यामागे 10 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नवी पाणीपुरवठा योजना औरंगाबादकरांसाठी महागडी ठरण्याची शक्यता आहे.

नाशिक:

खाद्यतेलाच्या दरात नाशिकमध्ये लिटरमागे 10 ते 15 रुपये वाढ झाली आहे. विदेशातून खाद्य तेलाचं आयात होण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. पुढील काही दिवसात हे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सोयाबीन तेल 118 रुपये प्रति लिटर आहे. तर सूर्यफूल तेल 134, पामतेल 115 आणि शेंगदाणा तेल 150 रुपये प्रति लिटर प्रमाणे मिळत आहे.

नागपूर:

नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या चाचणीमध्ये 67 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 9वी ते 12वीच्या एकूण 5 हजार 158 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबरपासून सुरु झाल्या आहेत. मंगळवारी सर्व शाळांमध्ये मिळून 20 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 13 तालुक्यातील एकूण 648 शाळांमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग नियमितपणे सुरु झाले आहेत. शिक्षण विभागाकडून वेळोवेळी शाळांची पाहणी करण्यात येत आहे.

पुणे:

पुणे जिल्ह्यातील सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. यापैकी 30 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य खात्याला पाठवण्यात आली आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा असे एकूण सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. पुणे शहराचा विचार केला तर 46 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

राज्यातील तीन मोठी शहरं, पाच महत्वाच्या बातम्या

जेईई मेन्स 2021 : यंदा चारवेळा परीक्षा, पहिलं सत्र फेब्रुवारीत

Four big cities Five important news

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.