अखेर पुणे शहरात पाणी कपात होणार, 18 मे पासून पुण्यात पाणी कपात ‘या’ दिवशी पाणी कपात

गेल्या काही आठवड्यांपासून पाणी कपात होईल अशी चर्चा सुरू असतांना पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी कपात करत असल्याचे जाहीर केले आहे.

अखेर पुणे शहरात पाणी कपात होणार, 18 मे पासून पुण्यात पाणी कपात 'या' दिवशी पाणी कपात
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 7:31 PM

पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. अखेर त्याबाबत निर्णय झाला असून 18 मे पासून पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगर पालिकेने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने पुणे महानगर पालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण, साखरी क्षेत्रात पाणीसाठा कमी असल्याने आता शहराला दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहेत. याशिवाय यंदाचा पावसाळा लांबण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवला आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज पाणी नियोजनासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाचे अनिरुद्ध पावसकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दक्षिण महासागरामध्ये अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मॉन्सून लांबणीवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्य शासनाने पाणीटंचाईचा आराखडा सादर करण्याच्या स्थानिक प्रशासनाला दिलेल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

धरणातील पाणीसाठा बघता आणि भविष्यातील पाऊस पडण्याचा अंदाज बघता पुणे महानगर पालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अनेक हवामान अभ्यासकांनी पावसाबाबत काही अंदाज वर्तविले आहे. त्यामध्ये जुलै अखेर पर्यन्त पाणीसाठा असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

पुणे महानगर पालिकेच्या वतीने यापूर्वी पाण्याच्या संदर्भात बैठक घेतली होती. त्यामध्ये धरणात असलेल्या पाणी साठयासह पावसाचा अंदाज घेतला होता. त्यामध्ये काही आठवडे उलटल्यानंतर पाणी कपात होऊ शकते अशी शक्यता होती. त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार कायम होती.

आज पाणी कपातीच्या संदर्भात अखेर निर्णय झाला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे 18 मे पासून हा निर्णय लागू होणार आहे. मे, जून आणि जुलै या महिण्यात पाणी कपात सध्याची परिस्थिती पाहता राहील. नंतरच्या काळात पुन्हा काही बदल झाल्यास पाणी कपातीच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकूणच पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यामध्ये पाण्याची काटकसर जितक्या प्रमाणात करता येईल तितक्या प्रमाणात पाणी जपून वापरणे काळजी गरज आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.