AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये महाभूकंप, पुणे येथून गेलेल्या 39 जणांचं काय झालं? मोठी अपडेट काय?

Nepal Earthquake and pune | नेपाळमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी रात्री मोठा भूकंप झाला. यात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली आहे. नेपाळमध्ये पुणे शहरातील 39 जण पर्यटनासाठी गेले होते. त्यांनाही या भूकंपाचा धक्का बसला. हे सर्व जण शनिवारी नेपाळमधून पुणे शहरात येणार होते.

नेपाळमध्ये महाभूकंप, पुणे येथून गेलेल्या 39 जणांचं काय झालं? मोठी अपडेट काय?
Nepal EarthquakeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 04, 2023 | 10:12 AM
Share

योगेश बोरसे, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपामुळे 129 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. नेपाळमधील जजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भाग भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. नेपाळमध्ये महिन्याभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. नेपाळमधील भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान नेपाळमध्ये पर्यंटनासाठी पुणे येथील 39 प्रवासी गेले होते. त्यांनाही भूकंपाचे धक्का जाणवले. हे सर्व जण सुखरुप आहेत.

हॉटेलमध्ये असताना जाणवले धक्के

पुणे येथील 39 प्रवासी नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पुण्यातील अर्चीस इंटरनेशनल टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून हे सर्व जण नेपाळ दर्शनासाठी गेले होते. हे सर्व पुणेकर चितवन जवळील सौरह येथील रॉयल सफारी या हॉटेलमध्ये थांबले होते. 3 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.55 वाजण्याच्या सुमारास सर्व जण हॉटेलच्या रूममध्ये होते. त्यावेळी त्यांना अचानक बेड हलू लागल्याची जाणीव झाली. त्यानंतर सर्व प्रवासी हॉटेलच्या इमारतीमधून सौरा वैरा पळत बाहेर आले. एका मोकळ्या जागेत सर्व जमा झालेत.

शनिवारी पुणे शहरात दाखल होणार होते

पुणे येथील नेपाळमध्ये गेलेल्या सर्वांना भूकंपाच्या धक्काची जाणीव झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर 6.4 भूकंप आल्याचे त्यांना बातम्यांमधून कळाले. त्यानंतर अनेकांनी घरी फोन लावून आपल सुखरुप असल्याचे कळवले. या सर्व जणांचा आज नेपाळमधील ट्रीपचा शेवटचा दिवस होता. हे सर्व जण पहाटे तीन वाजता नेपाळमधून निघाले. गोरखपूरवरुन शनिवारीच ते पुण्याला दाखल होणार आहे.

दरम्यान नेपाळमधील या भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरे पडली आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. जगभरातून नेपाळाला मदत सुरु झाली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.